मुंबई, 5 मार्च : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान, आज विधानसभेत मंत्री गुलाबराव पाटील-आदित्य ठाकरे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला असता त्यावर प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील आक्रमक झाल्याचे दिसून आले. मंत्र्यांनी अभ्यास करुन सभागृहात उत्तरं दिली पाहिजे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. दरम्यान, माझा अभ्यास आहे म्हणूनच मला तुमच्या वडिलांनी खातं दिलं होतं, असे उत्तर मंत्री पाटील यांनी दिले.
नेमकी बातमी काय? –
विधानसभेत पाणी प्रश्नावरून प्रश्न उपस्थित केला असता मंत्री गुलाबराव पाटील यांना त्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. यावेळी आदित्य ठाकरेंनी मंत्री गुलाबराव पाटलांना टोला लगावला. आदित्य ठाकरे म्हणाले की, काहीही विचारलं तर मंत्री महोदय लगेच केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मंत्र्यांना खाते कळले आहे की नाही हाच प्रश्न आहे. दरम्यान, गुलाबराव पाटील यांनीही आदित्य ठाकरेंना उत्तर दिले.
गुलाबराव पाटील यांचं प्रत्युत्तर –
गुलाबराव पाटील म्हणाले की, मला खाते कळते, म्हणूनच तुमच्या वडिलांनी मला ते खातं दिलं होतं. अशातच आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, म्हणून तर तुम्ही पळून गेलात. दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी दोघांच्या वक्तव्याची दखल घेत यक्तिक कमेंट करुन का. मी हे रेकॉर्डवर घेणार नाही, असे सांगितले.
हेही वाचा : Video : “…..’त्यांना’100 टक्के जेलमध्ये टाकू!”, विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर संतापले