ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 9 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली असून मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून जोरदार प्रचार केला जात आहे. दरम्यान, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेच्या तारखेत बदल करण्यात आला असून 12 नोव्हेंबर मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता ही सभा पार पडणार आहे.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले?
पाचोरा भडगाव मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाचोऱ्याला येणार आहेत. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली की, राज्याचे मुख्यमंत्री माझ्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांच्या सभेची आधी 13 नोव्हेंबर ही तारीख मिळाली होती. मात्र, राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा होत असल्याने ही तारीख बदलण्यात आली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाचोऱ्यातील प्रचारसभा ही 13 नोव्हेंबर ऐवजी 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता अटल मैदानावर पार पडणार आहे, अशी माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली आहे. या सभेसाठी मतदारसंघातील जनतेने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे.