चोपडा, 20 जानेवारी : गुटखा विक्रेत्याला औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे भासवत पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चोपडा शहरातून तीन तोतया अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून तिसरा संशयित पसार झाला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील जयहिंद कॉलनी परीसरात तीन तोतया अधिकारी त्यांच्या ताब्यातील वाहन उभे करून संशयितरित्या फिरत असताना लक्षात आले. याची माहिती मिळताच घटनास्थळी प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण व इतर पोलिसांचे पथक गेले असता त्यांना संशयित आरोपी संशयितरित्या तोतायागिरी करताना आढळले.
पाच लाखांची मागितली खंडणी –
फिर्यादी जितेंद्र गोपाल महाजन (28, लोहियानगर) यांना तिघे संशयितांनी औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याने भासवले. तसेच सोलापूर विभागात पोलिस कर्मचारी असलेला राहुल शिवाजी देवकाते (35, रा.साकटी रोड, पंढरपूर, जि.सोलापूर), विनायक सुरेश चवरे (35, रा.721, गोविंदपुरा सोलापूर रोड, गुर्जर वाडा, जि.सोलापूर), लक्ष्मण ताड (पूर्ण नाव गाव माहित नाही) अशा तीन आरोपींनी फिर्यादीकडून पाच लाखांची खंडणी मागण्यात आली.
दोघांना अटक –
संशयित आरोपींनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तोतयागिरी करून पाच लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली. म्हणून त्यांच्याविरोधात चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 170, 384, 419, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर आरोपी राहुल शिवाजी देवकाते व विनायक सुरेश चवरे यांना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.
याप्रकरणातील पुढील तपास चोपडा शहर पोलिस स्टेशनचे सपोनि अजित सावळे हे करीत आहेत. दरम्यान, संशयित आरोपींच्या ताब्यातील चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून या वाहनावरही आरोपींनी बनावट वाहन क्रमांक असलेली नंबर प्लेट लावली आहे.
हेही वाचा : Crime News : मूलबाळ होत नसल्याने छळ, कुसुंबा येथील विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल