धुळे, 6 फेब्रुवारी : स्वयंपूर्ण गाव निर्मितीतून देशाचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदचे सदस्य प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे यांच्या मार्फत उडाणे येथे ग्रामीण अध्ययन शिबीर दि. 5 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
शिबिराचे उद्धघाटन प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील ( व्यवस्थापन परिषद सदस्य, कबचौ उमवि, जळगाव) यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. विष्णू गुंजाळ प्राचार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे हे होते.
यावेळी उडाणे गावाचे सरपंच नबळाबाई पवार,उपसरपंच रामदास हालोर, भिका माळी, ( मुख्याध्यापक जि. प. शाळा उडाणे ) विठ्ठल बागुल ( माजी सरपंच, उडाणे ) नवल पाटील ( अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे ) राजेंद्र मोरे ( चेअरमन, शिक्षण समिती उडाणे ) प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर, प्रा. डॉ. राहुल आहेर, प्रा. डॉ. प्रीती वाहने, इत्यादी मांन्यवर उपस्थित होते.