जळगाव, 6 ऑगस्ट : राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटासमोर वारंवार आव्हान उभे केले आहे. अशातच शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात धरणगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे.
तरूणांच्या हाती शिवबंधन –
गुलाबराव पाटीलांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे. मंत्री पाटील यांच्या हस्ते शिवबंधन बांधून या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. दरम्यान, पुढील काळात राज्यात लोकसभेसोबतच विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी केलेला हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
ठाकरे गटाला धक्का –
जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगावमध्ये गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे सदस्य नोंदणी अभियान पार पडले. या अभियाना दरम्यान शेकडो तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कार्यकर्त्यांनी हाती शिवबंधन बांधले. यामध्ये ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला अजून एक धक्का बसल्याचे मानले जात आहे.
सदस्य नोंदणी अभियान –
धरणागावमध्ये शिवसेनेचे सदस्य नोंदणी अभियान पार पडले. या अभियानामध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या देखील काही कार्यकर्त्यांचा समावेश आहे. दरम्यान, या तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जोरदार घोषणाबाजी केली.