ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 17 मार्च : तालुक्यातील वाळी शेवाळे येथे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद जळगाव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची बैठक तथा प्रबोधनात्मक कार्यक्रम काल घेण्यात आला. प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राजु खरे तथा मुकेश नेतकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कार्यकर्त्यांना संबोधित केले. तसेच बैठकीचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे खान्देश प्रभारी अॅड. रणजीत तडवी हे होते. संघटनेचा वाढविस्तार, सामाजिक कामाची दखल घेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा सचिवपदी रौनक तडवी यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक यांनी आदिवासी समाजाच्या संविधानिक हक्क अधिकार तथा आदिवासींना नक्षलवादच्या नावाखाली मारले जाते या देशात संविधानातील पाचवी सहावी अनुसुचि लागु न करणे भयानक षडयंत्र अशा अनेक विषयांवर प्रबोधन करण्यात आले
येणाऱ्या काळात गाव तेथे शाखा कशी निर्माण करण्यात येतील, संघटनेचा वाढ विस्तार करुन आदिवासी समाजात जन जागृती करण्यात यावी व खरा शत्रू कोण हे देखील आदिवासी समाजाने आता जाणुन घेणे गरजेचे आहे.
जळगाव जिल्हा अध्यक्ष गफुर तडवी शमा तडवी, करीम तडवी, अजित तडवी, राहुल सपकाळे, पाचोरा तालुका अध्यक्ष जलाल तडवी, तालुका उपाध्यक्ष मुस्तफा तडवी, तालुका सचिव जाकीर तडवी , पाचोरा तालुका भारत मुक्ती मोर्चा अध्यक्ष अबजल तडवी, सिल्लोड तालुका अध्यक्ष रज्जाक तडवी, सिल्लोड तालुका उपाध्यक्ष सलमान तडवी, सोयगाव तालुका अध्यक्ष दगडु तडवी, सरवर तडवी आलेरका तडवी, सलीम तडवी उखा तडवी, सरदार तडवी, ईसा तडवी, कलीम तडवी, शरीफ तडवी, आरिफ तडवी, बाबू तडवी, अशरफ तडवी, दगडु तडवी, सागर सावळे, अनिल तडवी, धोंडु तडवी, शरीफ तडवी, मोइद्दिन तडवी, भिकन तडवी जावेद तडवी, मोहम्मद तडवी, गंभीर तडवी, समीर तडवी, विनोद तडवी, राजु तडवी, मस्तान तडवी, मन्सूर तडवी, आरिफ तडवी,शकील तडवी, सोनु तडवी, शारुख तडवी, राजु तडवी, जलाल तडवी, इब्राहिम तडवी, कदीर तडवी, निसार तडवी, मोहम्मद तडवी, मुनीर तडवी, मनोज तडवी, आसिफ तडवी, सलीम तडवी, राहुल तडवी, अविनाश तडवी,हुसेन तडवी, भैय्या तडवी,जाबीर तडवी, सादिक तडवी, ईसा तडवी, चंदु तडवी,आदी शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा : मुतखड्यासाठी आता जळगावात अद्यावत मशीन, रूग्णांचे हजारो रूपये वाचणार, काय आहे संपूर्ण बातमी?