ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 12 ऑक्टोबर : जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत डॉ. केतकी पाटील फाऊंडेशन तर्फे बुधवार (११ ऑक्टोबर) रोजी पाचोरा येथील पोलिस ठाण्यात मानसिक आरोग्याची जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशन सदस्या डॉ. केतकी पाटील, मानसोपचार तज्ञ डॉ. विलास चौहान, डॉ सौरभ, समुपदेशक बबन ठाकरे यांचे पोलीस उपअधीक्षक धनंजय येरुळे, यांच्यासह पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. केतकी पाटील यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसिक स्वास्थ्यासंदर्भात मार्गदर्शन केले. दरम्यान, पाचोरा पोलिस ठाण्यातर्फे डॉ केतकी पाटील यांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
जागतिक मानसिक आरोग्य दिन –
जागतिक मानसिक आरोग्य दिन हा दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस पहिल्यांदा 1992 मध्ये वर्ल्ड मेंटल हेल्थ असोसिएशनच्या पुढाकाराने साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त नागरिकांच्या मानसिक आरोग्याशी संबंधीत समस्याबाबत जनजागृती निर्माण कण्यासाठी आणि आपले मानसिक आरोग्य जपण्यासाठी हा दिन जागतिक स्तरावरही साजरा केला जातो.