मुंबई, 9 जून : यंदाच्या जानेवारी महिन्याच्या अखेरीस जळगाव जिल्ह्यात पुष्पक रेल्वेच्या अपघाताची धक्कादायक घटना घडली होती. अशातच आता पुन्हा एकदा रेल्वे अपघाताची बातमी समोर आली आहे. सीएसएमटीहून कसाराकडे जाणाऱ्या धावत्या लोकलमधून 8 जण खाली पडल्याने 5 जणांचा मृत्यू झालाय. तर इतर तीन जण गंभीररित्या जखमी आहेत. मुंब्रा ते दिवा स्टेशन दरम्यान लोकलच्या डब्यातील फूटबोर्डवर लटकलेले प्रवासी खाली पडले. यावेळी दोन लोकल रेल्वे एकमेकांच्या विरूद्ध दिशेने जात होते तेव्हा ही दुर्दैवी घटना घडलीय.
Mumbra ते Diva रेल्वे स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं? –
मध्ये रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला म्हणाले की, लोकल ट्रेनमध्ये फूट बोर्डवर (दरवाज्याच्या टोकावर) प्रवास करत होते. असे असताना वळणावर एक-दुसऱ्यांशी प्रवाशांच्या बॅगा लागल्यामुळे ते लोकल ट्रेनमधून 8 जण खाली पडले. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून इतर प्रवाशी जखमी आहेत. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, नवीन ज्या गाड्या येणार आहेत त्या ऑटोमेटिक डोअर सिस्टमच्या असणार असल्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला असल्याचेही नीला म्हणाले.
आज सकाळी रेल्वे अपघातातबाबत माहिती समोर आल्यानंतर सदर अपघात झाला तेव्हा सुरुवातीला पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशी खाली पडल्याची माहिती सुरूवातीला सांगण्यात येत होती. तर दुसरीकडे मात्र पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली. यामुळे हा अपघात नेमका कसा घडला याचा सखोल तपास सुरू आहे.