भ्रष्टाचार हा एक धंदा झाला आहे, प्रशासनातील सर्व लोकं एकत्र आली आहेत आणि इतर लोकं दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळे हा देश या परिस्थितीमध्ये आहे. राजकीय लोकं येतात, जातात. पण या देशाला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खराब केलं, त्यामुळे सरकारने प्रशासनातील सुधारणेवर (governance improvement) लक्ष द्यायला हवं, असं परखड मत ज्येष्ठ सनदी अधिकारी अरूण भाटिया यांनी व्यक्त केलं आहे. आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासकीय व्यवस्थेवरील कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे यूपीएससी, प्रशासकीय व्यवस्था आणि त्यातील भ्रष्टाचार या संपूर्ण विषयावर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजने त्यांची विशेष मुलाखत घेतली.