मुंबई, 25 ऑगस्ट : राज्य शासनाच्यावतीने या वर्षीपासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या राज्य उत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ च्या अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेस मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांना सहभागी होता यावे, यासाठी आता अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख मंगळवार दि. २६ ऑगस्ट २०२५ असेल.
या स्पर्धेचे अर्ज https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून ऑनलाईन पोर्टलद्वारे ते स्वीकारले जाणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक मंडळांनी सहभागी होऊन तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पारितोषिके जिंकावीत, असे आवाहन मंत्री ॲड. शेलार यांनी केले आहे.