• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

आई-वडिलांचे छत्र हरपल्यावर खचली नाही, पाचोऱ्याच्या तरुणीची MPSC परिक्षेत निवड, मान्यवरांनी केले सन्मानित

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
October 5, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
ssmm college pachora

योगिता रवींद्र चौधरी या तरुणीचा सत्कार करताना मान्यवर.

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा – आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही न खचता, न थकता अत्यंत विपरीत परिस्थितीत अभ्यास करून एका तरुणीने यश कसे मिळवता येते, हे सिद्ध करुन दाखवले आहे. योगिता रवींद्र चौधरी असे या तरुणीचे नाव आहे. योगिता या तरुणीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे मंत्रालयीन महसूल सहाय्यक तथा नंदुरबार जिल्हा परिषद येथे कनिष्ठ सहाय्यक या पदांवर निवड झाली आहे. तिच्या या यशानंतर पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

योगिता ही पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. तिच्या मिळवलेल्या या यशानंतर महाविद्यालयीन परिवारातर्फे, माजी विद्यार्थी संघ तथा चौधरी समाजातर्फे तिचा सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गो. से. हायस्कूलचे चेअरमन खलीलदादा देशमुख हे होते.

संस्थेचे अध्यक्ष आणि माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, तसेच मानद सचिव महेश देशमुख, विद्यमान प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी योगिताला पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे शुभेच्छा देत तिचे अभिनंदन केले. तसेच माजी विद्यार्थी संघाच्या वतीने माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष खलील देशमुख, कार्याध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, तसेच सचिव इतिहास विभाग प्रमुख डॉ. जे. डी. गोपाळ यांनी योगिताला सन्मानित केले.

तसेच चौधरी समाजाच्या वतीने ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी, शांताराम चौधरी, तसेच धरणगावच्या कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट देऊन योगिताचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक एस. एस. पाटील, शांताराम चौधरी, सुनील चौधरी, स्पर्धा परीक्षेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले यांची समायोजित भाषणे झालीत.

त्यानंतर योगिताने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी तर सूत्रसंचालन डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी केले. अध्यक्षीय भाषण खलीलदादा देशमुख यांनी केले तर आभार डॉ. सुनीता गुंजाळ यांनी मानले. याप्रसंगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora newspachora ssmm collegepachora ssmm college newsssmm college pachorasuccess story

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात शुभारंभ; उमेदच्या 2 हजार महिलांचा सहभाग

धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात शुभारंभ; उमेदच्या 2 हजार महिलांचा सहभाग

September 18, 2026
नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून नाशिक विभागात राबविण्यात येणार सेवा संकल्प अभियान

नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून नाशिक विभागात राबविण्यात येणार सेवा संकल्प अभियान

September 18, 2026
जळगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

जळगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

September 18, 2026
गिरणा नदीपात्रात महसूल-पोलिसांची वाळू माफियांवर धडक कारवाई; 29 वाहने जप्त, तब्बल 3 कोटी 60 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

गिरणा नदीपात्रात महसूल-पोलिसांची वाळू माफियांवर धडक कारवाई; 29 वाहने जप्त, तब्बल 3 कोटी 60 लाखांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Pachora Taluka News: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण

Pachora Taluka News: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण

September 17, 2026
जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान;  लोकचळवळ म्हणून अभियान राबवा: ZP CEO करिश्मा नायर यांचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान;  लोकचळवळ म्हणून अभियान राबवा: ZP CEO करिश्मा नायर यांचे आवाहन

September 17, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page