ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 19 जानेवारी : पाचोरा येथील शेतकरी संघाची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, या निवडणुकीत 15 जागांसाठी 63 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून माघारीसाठी 24 जानेवारी हा दिवस अंतिम आहे.
शेतकरी संघ निवडणूक –
शेतकरी संघाच्या या निवडणुकीत सर्व पक्षांच्या नेतेमंडळीचे उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांनी या निवडणुकीत युती केली आहे. यामध्ये माजी आमदार दिलीप वाघ यांच्यातर्फे 9 उमेदवार निवडणूक लढवत असून आमदार किशोर पाटील यांचे 6 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, वैशालीताई सूर्यवंशी व अमोल शिंदे यांच्यातर्फेही प्रत्येकी 15 जागेसाठी 15 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहेत.
3 जागा बिनविरोध –
आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांनी आज पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पत्रकार परिषद घेत बिनविरोध संदर्भात घोषणा केली. या पत्रकार परिषदेत माजी आमदार दिलीप वाघ यांच्या गटाच्या 3 जागा बिनविरोध घोषित करण्यात आल्या आहेत.
निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न –
शेतकरी हितासाठी शेतकी संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू, बिनविरोध झाल्यास अधिक आनंद आहे. अन्यथा निवडणूक लागल्यास आमच्या गटाचे 15 चे 15 उमेदवार निवडून येतील, असे आमदार किशोर पाटील व दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी दोन्ही गटाचे उमेदवार नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : कठीण काळात प्रजापिता ब्रह्मकुमारींनी पाठबळ दिले, वैशाली सुर्यवंशी यांचे सामनेर येथे प्रतिपादन