चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 27 मे : गेल्या अनेक दिवसांपासून रामदेववाडी अपघात प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. दरम्यान, या अपघातात पोलिसांकडून तपास सुरू असताना, माणसे चिरडून टाकण्याची यांची हिंमत होतेच कशी?, असा सवाल माजी खासदार उन्मेश पाटील यांनी उपस्थित केला आहे. जळगावात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले उन्मेश पाटील? –
रामवादेवाडी अपघातातील पीडित कुटुंबियांना कुठलाही मंत्री त्याठिकाणी भेटायला आलेला नाही. बालसंगोपनाच्या दिवशी ड्यूटी करण्यासाठी गेलेली महिला नशेत असलेल्या तरूणांकडून अपघातादरम्यान चिरडली जाते, हे दुर्दैव आहे. दरम्यान, रामदेववाडी अपघात प्रकरण गंभीर स्वरूपाचे असताना पुणे अपघातानंतरच पोलिसांना जाग आली.
सखोल चौकशी झाली पाहिजे –
रामदेववाडी अपघातात प्रकरणात ज्या श्रीमंत घरातील मुलांनी गरीब कुटुंबियांचा जीव घेतला आहे. त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. अपघातात निरापधार बळी गेले, त्या निरापधार बळी घेणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू नका. त्यांचा सखोल तपास घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. वेळेत कारवाई झाली नाही तर शिवसेना म्हणून आम्ही त्या कुटुंबियांच्या आणि समाजासोबत उभे राहू, असेही उन्मेश पाटील म्हणाले.
उन्मेश पाटील यांचे डोके फिरलंय, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेश पाटील यांच्यावर केली होती. दरम्यान, या टीकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, 4 तारखेला कळेल कोणाचे डोके तपासण्याची गरज आहे. रामदेवावाडी अपघात प्रकरणात जिल्ह्यातील मंत्र्यांकडून दुर्लक्ष झाले असून यामध्ये जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
हेही वाचा : “देशाला फूलटाईम कृषी मंत्री नाही, अन् कृषीप्रधान देश म्हटला जातो”, उन्मेश पाटील यांची सरकारवर टीका