ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 27 ऑक्टोबर : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचा 1 नोव्हेंबर रोजीचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. दरम्यान, आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 2 नोव्हेंबर रोजी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून किशोर आप्पा पाटील बहुद्देशीय संस्था पाचोरा व द युनिक अकॅडमी शाखा जळगाव यांच्या संयुक्त विद्यामाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
पाचोरा-भडगाव तालुक्याच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत व खुली ही भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा असून 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पाचोऱ्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील व्यापारी भवनात ही स्पर्धा पार पडणार आहे.
भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी विद्यार्थ्याने सोबत येताना पॅड पेन व ब्लॅंक पेज सोबत ठेवावे. स्पर्धेतील सहभागासाठी नाव नोंदणी आवश्यक असून नाव नोंदणी साठी खालील लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म भरावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
https://forms.gle/V9iZm4MJ8mNSqMq97
संपर्क –
8929728418/
📞https://chat.whatsapp.com/HdyMaFaJrGE4UcJWdyUT9R?mode=wwt
स्पर्धेसाठी ‘असे’ असतील बक्षीसे –
प्रथम बक्षीस – ₹11,000/- रोख
द्वितीय बक्षीस – ₹7,100/- रोख
तृतीय बक्षीस – ₹5,100/- रोख
चतुर्थ बक्षीस – ₹3,100/- रोख
पाचवे बक्षीस – ₹1,100/- रोख
स्पर्धेतील नियम व अटी –
- परीक्षा फक्त प्रत्यक्ष ऑफलाइन स्वरूपात असेल.
- उमेदवाराने 1 तास आधी प्रत्यक्ष उपस्थीत रहावे.
- परीक्षा ठिक 11 वाजता सुरु होईल – कालावधी – 1 तास.
- परीक्षेत मोबाइलचा वापर करू नये.
- 100 प्रश्नांची परीक्षा असुन GK, चालू घडामोडी, गणित, बुद्धीमत्ता. अश्या समग्र अभ्यासक्रमावर आधारित असेल.
- नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांशीवाय इतरांना प्रवेश नसेल.
- परीक्षा पात्र विद्यार्थ्यांचे वय 18 ते 34
- उपक्रम पूर्णपणे मोफत व खुला आहे.
- सर्व अधिकार आयोजकांकडे राखीव असतील. (निकालाचा दिनांक इ.)
हेही वाचा : इंजिनिअर ते अभिनेता..अन् अचानक शेवट; पारोळ्याच्या सचिन चांदवडेचा टोकाचा निर्णय






