• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या बँकांना महत्वाच्या सूचना

जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, सहकारी बॅंकाच्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 30, 2023
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीत बोलताना

पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीत बोलताना

जळगाव, 30 डिसेंबर : जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात दुष्काळ पडला आहे. रावेर मधील दोन महसूल मंडळ वगळता जिल्ह्यातील इतर सर्व महसूल मंडळात दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे‌. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व बॅंकांनी शेतकऱ्यांकडे कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावू नये. चालू हंगामातील पीक कर्जाचे व्याजासह पुर्नगठन करण्यात यावे. अशा स्पष्ट सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे बॅंकांना दिल्या.

काय म्हणाले पालकमंत्री गुलाबराव पाटील? –
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, शासनाने पीक कर्जाचे पुर्नगठनासोबत शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वसूलीस स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर कृषी पंपाच्या वीज बीलात ३३ टक्के सवलत दिली आहे. शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी दिली आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बॅंकांनी ही शेतकऱ्यांना सहकार्य करावे.

यावेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पीक विमा भरपाईबाबत बोलतांना‌ पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक विमाचा प्रश्न मिटला असून कंपनीचे दावे फेटाळण्यात येऊन या शेतकऱ्यांना 71 कोटी 30 भरपाई देण्यास सुरुवात झाली‌ आहे. जिल्ह्यातील ७ तालुक्यातील २७ महसूल मंडळातील 1 लाख 25 हजार शेतकऱ्यांना कापूस पीक विमा भरपाईचा लाभ मिळत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगाव प्रांताधिकारी महेश सुधळकर, लीड बॅकेचे मॅनेजर प्रणव झा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक सुनिल पाटील, तसेच जिल्ह्यातील इतर सर्व प्रमुख बॅंकांचे प्रतिनिधी, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कर्जाची वसूली करू नये –
पीक विमा रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यातून कर्जाची वसुलीच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर बॅंकांनी शेतकऱ्यांच्या पीक विमा रकमेतून कर्जाची वसूली करू नये. अशा सूचना ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिल्या. अतिवृष्टी, अवकाळी किंवा पावसाचा खंड यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्यात यावे. अशा सूचना ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

शासन पातळीवर प्रयत्न –
काही गावांमध्ये एकत्रीकरण योजना झालेली नाही त्या गावांचे बाबतीत सातबारा हे सर्व्हे नंबरचे आहेत. अशावेळी पीक विमा कंपनी महाराष्ट्र रिमोट सेंसिंग एप्लिकेशन्स सेंटरकडून जो नकाशा बघतात तो गटांचा दिसतो. परंतु सातबारा हे सर्व्हे नंबरचे आहेत. त्यामुळे ते जुळून येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा अनुदान‌ प्रलंबित राहते. अशा गावांच्या बाबतीत भूमी अभिलेख कडील सर्व्हे नंबरचे नकाशे वापर करता येईल. यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केले जातील. अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्वाच्या सूचना –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या कर्जाच्या पुर्नगठन सारख्या सवलतीबाबत गावपातळीवर मेळावे, विशेष शिबीरे घेऊन माहिती पोहचविण्यात यावी. क्रेडिट सोसायटींमध्ये बैठका घेण्यात याव्या. शेतकऱ्यांचे बॅंक पासबुक वरील नाव व आधारकार्ड मधील नावात तफावत असल्यास अशा शेतकऱ्यांसाठी आधार दुरूस्ती कॅम्प घेतले जातील. असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ayush prasadfarmersgulabrao patiljalgaon news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘बिना पगाराचं जगायचं कसं?’, एरंडोल तालुक्यातील पगार थकलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचा सवाल

‘बिना पगाराचं जगायचं कसं?’, एरंडोल तालुक्यातील पगार थकलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचा सवाल

May 12, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री देशाला करणार संबोधित; नेमकं काय बोलणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री देशाला करणार संबोधित; नेमकं काय बोलणार?

May 12, 2025
SSC Result 2025 : दहावीचा निकाल उद्या 13 मे रोजी होणार जाहीर; विद्यार्थ्यांना ‘या’ पद्धतीने पाहता येणार निकाल

SSC Result 2025 : दहावीचा निकाल उद्या 13 मे रोजी होणार जाहीर; विद्यार्थ्यांना ‘या’ पद्धतीने पाहता येणार निकाल

May 12, 2025
Pachora News : शिवसेनेची पाचोरा-भडगाव तालुक्याची कार्यकारिणी जाहीर; नेमकं कोणाला मिळालं कोणतं पद?

Pachora News : शिवसेनेची पाचोरा-भडगाव तालुक्याची कार्यकारिणी जाहीर; नेमकं कोणाला मिळालं कोणतं पद?

May 12, 2025
Breaking! विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतला संन्यास; इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?

Breaking! विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतला संन्यास; इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?

May 12, 2025
राज्यात पुढील चार दिवस पावसाचे; जळगाव जिल्ह्याचा नेमका हवामान अंदाज काय?

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे; जळगाव जिल्ह्याचा नेमका हवामान अंदाज काय?

May 12, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page