ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा – पाचोरा तालुक्यातील सर्रास वाळू वाहतूक सुरू असते. याच पार्श्वभूमीवर पाचोरा आणि भडगाव तालुक्यात महसूल पथकाने मोठी कारवाई केली आहे. गिरणा नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा आणि वाहतूक करणाऱ्या तब्बल 8 वाहनांवर महसूल पथकाने ही कारवाई केली. यामध्ये भडगाव तालुक्यातील गिरड, आमडदे भागातून दोन ट्रॅक्टर, पाचोरा तालुक्यातील परधाडे येथून 6 ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.
अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणारी परधाडे येथून ज्पत करण्यात आलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले आहेत. ही कारवाई कुऱ्हाड मंडळ अधिकारी भरत नन्नवरे, ग्राम महसूल अधिकारी नकुल काळकर, प्रवीण पवार, नरेंद्र पाटील, निखिल बळी यांचा समावेश होता.
सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी –
पाचोरा तालुक्यातील सर्रास वाळू वाहतूक सुरू असते. याच पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई करण्यात आली. पोलीस आणि महसूल विभागाने महाराणा चौक, जळगाव चौफुली, जारगाव चौफुली, अंतुर्ली फाटा, बिल्दी फाटा या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
गुलाबराव देवकरांच्या अजित पवार गटातील प्रवेशावर एकनाथ खडसेंची सावध प्रतिक्रिया; पाहा, VIDEO