जळगाव, 6 जुलै : सध्या राज्याच्या काही भागात सध्या चांगला पाऊस पडत असला तरी काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे. बऱ्याच ठिकाणी पावसाअभावी शेतीची कामे देखीळ खोळंबल्याचे चित्र दिसून आले आहे. तसेच ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे, त्या ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आला आहे.
राज्यात मुसळधार पाऊसाची शक्यता –
मान्सून राज्यात सर्वदूर सक्रीय झाला असून अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण कोकणात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज? –
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून संध्याकाळच्या सुमारास हलक्या स्वरूपात पाऊसाच्या सरी कोसळताय. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आज अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हेही वाचा : ‘आमच्या 50 जणांच्या टीमने काढलेली विकेट कुणीही…,’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?