• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) पिंप्री खुर्द येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वामी कुल्फी’ उद्योग केंद्राचा भव्य शुभारंभ

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; ग्रामीण युवकांना रोजगाराची नवी दिशा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 15, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
“प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME)  पिंप्री खुर्द येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘स्वामी कुल्फी’ उद्योग केंद्राचा भव्य शुभारंभ

जळगाव, 14 डिसेंबर : “प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) ही ग्रामीण युवक, महिला व शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. प्रत्येक गावात असे प्रक्रिया उद्योग उभे राहिले, तर स्थानिक रोजगार निर्माण होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल. शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल. या योजनेंतर्गत पिंप्री येथे स्वामी कुल्फी उद्योग केंद्रामुळे १५ ते २० स्थानिक नागरिकांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लघुउद्योगांना चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पिंप्री खुर्द येथे आज स्वामी कुल्फी या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग केंद्राचा भव्य व उत्साहपूर्ण शुभारंभ पालकमंत्री तथा स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला. पालकमंत्र्यांचे फटक्यांच्या आकाशवाणीत व ढोल ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी स्वामी कुल्फी उद्योग केंद्राचे संचालक श्री. जयेश सुनिल बडगुजर यांनी मान्यवरांना उद्योगाच्या उत्पादन प्रक्रिया, कुल्फी, कँडी व दुग्धजन्य पदार्थ निर्मितीबाबत सविस्तर माहिती दिली. अवघ्या २४ व्या वर्षी युवकाने उद्योग उभारल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष समाधान व्यक्त करत युवकांसाठी हा प्रेरणादायी आदर्श असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP) समाधान पाटील यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षक योगेश मोहकर यांनी तर आभार आयोजक जयेश बडगुजर यांनी मानले.


यांची होती उपस्थिती –
या कार्यक्रमास जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री दोहरे, जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP) समाधान पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल बापू चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सभापती पी. सी. आबा पाटील, पिंप्री खुर्द चे माजी सरपंच ज्ञानेश्वर बडगुजर, पोलीस पाटील गोपाल बडगुजर, सुनिल बडगुजर, भोद चे माजी सरपंच राजेंद्र पाटील, विद्यमान सरपंच तथा विजय मार्बलचे संचालक विजय पाटील, सेवा सुपर मार्टचे संचालक संदीप पाटील, सामाजिक कार्यकर्त्या कमलाबाई धोबी, जळगावचे रोशन पाटील यांच्यासह पिंप्री खुर्द व अंजनी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तरुण उद्योजक जयेश बडगुजर व आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.

हेही वाचा : जळगावात उद्यापासून आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा; मंत्री अशोक वुईके यांच्या हस्ते होणार उद्घाटन

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao patiljalgaon newsmarathi newspm micro food processing enterprises schemesuvarna khandesh liveswami kulfi industry center

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्ती म्हणजे शासनाच्या योजनांचे आधारस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्ती म्हणजे शासनाच्या योजनांचे आधारस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 20, 2026
वाहतूक नियम भंग; ई-चलनद्वारेच दंड आकारणी, गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची विधानपरिषदेत माहिती

वाहतूक नियम भंग; ई-चलनद्वारेच दंड आकारणी, गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांची विधानपरिषदेत माहिती

March 20, 2026
आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी जागा राखीव; कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही – मंत्री दादाजी भुसे

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी जागा राखीव; कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही – मंत्री दादाजी भुसे

March 20, 2026
शेतकऱ्यांना केळीचा योग्य दर मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येतील – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

शेतकऱ्यांना केळीचा योग्य दर मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येतील – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

March 20, 2026
शेतकरी हा अन्नदाता असून देवासमान; रासायनिक खतांचा अतिरेक थांबवून नैसर्गिक शेतीकडे वळणे ही काळाची गरज – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

शेतकरी हा अन्नदाता असून देवासमान; रासायनिक खतांचा अतिरेक थांबवून नैसर्गिक शेतीकडे वळणे ही काळाची गरज – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

March 20, 2026
आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

March 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page