• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा ‘त्या’ व्हिडिओची होणार चौकशी, जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महत्वाचे आदेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 25, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा ‘त्या’ व्हिडिओची होणार चौकशी, जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महत्वाचे आदेश

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव, 25 जून : नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर पैसे वाटप झाल्याचा व्हिडिओ ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट केला होता. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याप्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश –
नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी जळगावात झालेल्या बैठकीनंतर कथित पैसे वाटपाच्या प्रकाराची जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी केली जाणार आहे. या गंभीर प्रकारणाची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

जळगावचे प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांना या प्रकरणाची चौकशी करण्याबाबतचे पत्र उपजिल्हाधिकारी यांनी दिले आहे. सदर प्रकरणाबाबतचा चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागवण्यात आला आहे. चौकशी करून जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

  • आदित्य लॉन्स या ठिकाणी 22 जूनला झालेल्या सभेसाठी परवानगी घेण्यात आली होती का? तसे नसल्यास नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी.
  • सदर चित्रीकरणात दिसून येणाऱ्या लोकांची शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांच्यामार्फत ओळख पटवावी.
  • सदर सभेदरम्यान झालेल्या चित्रीकरणाचे फुटेज तात्काळ ताब्यात घेण्यात यावेत आणि सदर चित्रीकरणाची भरारी पथकामार्फत चौकशी करावी.
  • सदर चित्रीकरणात पैसे घेऊन जात असल्याबाबतचे अभिलेख जप्त करण्यात यावे आणि अभिलेख गहाळ झाल्यास भारतीय पुरावा अधिनियम 1872 अन्वये आवश्यक ती कार्यवाही करावी.

काय आहे संपुर्ण प्रकरण? –
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जळगावच्या आदित्य लॉन्स येथे बैठक पार पडली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतर आदित्य लॉन्स येथे पैसे वाटप होत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता.

सुषमा अंधारे यांनी मुद्दा केला उपस्थित –
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केला गेल्याचा आरोप करत ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले. दरम्यान, कुठाय निवडणूक आयोग? असा प्रश्नही त्यावेळी अंधारे यांनी उपस्थित केला होता.

हेही वाचा : मोठी बातमी! सुषमा अंधारे यांचे खळबळजनक ट्विट, जळगावात मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा आरोप

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm eknath shindeias ayush prasadjalgaon latest newsjalgaon live newskishor daredenashik teachers constituency electionsushma andhare

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 24, 2026
Jalgaon News : पंचायत समिती अमळनेर येथील बनावट कागदपत्र प्रकरणी गुन्हा दाखल

Jalgaon News : पंचायत समिती अमळनेर येथील बनावट कागदपत्र प्रकरणी गुन्हा दाखल

January 24, 2026
जळगावात निलेश सोनवणे यांना ‘तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक’ पुरस्कार प्रदान

जळगावात निलेश सोनवणे यांना ‘तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक’ पुरस्कार प्रदान

January 23, 2026
गोव्यासाठी १६ हजार ५१२ कोटींच्या पतपुरवठ्याचा आराखडा सादर; कृषी, मत्स्यव्यवसाय व हरित उपक्रमांना संस्थात्मक पतपुरवठ्यावर भर

गोव्यासाठी १६ हजार ५१२ कोटींच्या पतपुरवठ्याचा आराखडा सादर; कृषी, मत्स्यव्यवसाय व हरित उपक्रमांना संस्थात्मक पतपुरवठ्यावर भर

January 23, 2026
Big Breaking! दिव्यांग तपासणीत तफावत आढळली अन् जिल्हा परिषदेच्या आणखी 6 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Big Breaking! दिव्यांग तपासणीत तफावत आढळली अन् जिल्हा परिषदेच्या आणखी 6 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

January 23, 2026
‘मनरेगा’ची जागा आता ‘VB-GRAM’ घेणार; ग्रामीण अर्थव्यवस्थेत क्रांती घडवण्यासाठी मोदी सरकार सज्ज – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची माहिती

‘मनरेगा’ची जागा आता ‘VB-GRAM’ घेणार; ग्रामीण अर्थव्यवस्थेत क्रांती घडवण्यासाठी मोदी सरकार सज्ज – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची माहिती

January 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page