ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 19 ऑक्टोबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनातील कामांना देखील वेग आला आहे. दरम्यान, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काल पाचोरा येथे प्रांताधिकारी कार्यालायात भेट दिली. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पाचोरा-भडगाव प्रांताधिकारी भूषण अहिरे तसेच तहसिलदार विजय बनसोडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आढावा –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या भेटीत निवडणूक निर्णय अधिकारी 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांचे कार्यालयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता स्थापन करण्यात आलेले आचारसंहिता कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, मिडीया सेल, एक खिडकी कक्ष, संगणक कक्ष व मतदार सुविधा कक्षाची पाहणी केली. यानंतर त्यांनी निवडणूक संदर्भात आढावा घेतला. तसेच संबंधित नोडल अधिकारी व त्यांचे सहायक यांना कामकाजाबाबत आवश्यक ते मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी MAIDC गोडावुन, गिरड रोड पाचोरा येथील Strong Room, Training Center, Counting Arrangments ची पाहणी करुन आवश्यक त्या सुचना दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या महत्वाच्या सूचना –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दुपारी 3.00 वाजता आर.ओ. तात्या व्यापारी संकुल, पाचोरा येथील सभागृहात सेक्टर ऑफीसर, नोडल अधिकारी, व पोलीस प्रशासन यांची संयुक्तीक बैठक घेवुन सर्व सेक्टर यांना त्यांच्या त्यांच्या अधिनस्त असलेल्या बी.एल.ओ. यांच्या बैठक घेवुन, त्यांचा व्हॉटसअप ग्रुप अॅक्टीव ठेवणे, व्होटर स्लिप वाटपाचे नियोजन, होम वोटींगसाठी वाहतुक व वेळेचा आराखडा तयार करणे सर्व मतदार केंद्राध्याक्ष मतदार अधिकारी यांची नियोजित दिवशी Hands’ On प्रशिक्षण घेणेबाबत सुचना दिल्यात.
तसेच पोलीस प्रशासन यांना निवडणूकीच्या कामासाठी आदर्श आचारसंहितेच्या भंग होणार नाही. तसेच कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही याकडे लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देशित केले. सदर निवडणूक प्रक्रिया अचुकपणे पार पाडणेबाबत मार्गदर्शन केले.
हेही वाचा :MLA Kishor Appa Interview : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची स्फोटक मुलाखत