• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा बंद, सकल हिंदू समाजाचा आक्रोश, जिल्ह्यात आज कुठे काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 16, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जळगाव जिल्हा बंद, सकल हिंदू समाजाचा आक्रोश, जिल्ह्यात आज कुठे काय घडलं?

जळगाव, 16 ऑगस्ट : बांगलादेश येथे अल्पसंख्यांक हिंदू यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आज सकल हिंदू समाजाच्यावतीने जळगाव जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान, जळगावसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बंद पाळण्यात आला. यावेळी सकल हिंदू समाजाच्यावतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तसेच हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

जळगाव शहरात काय घडलंय? –
सकल हिंदू समाजातील सर्व व्यापारी मंडळ, फुले मार्केट, गोलानी मार्केट, बि.जे मार्केट, दाना बाजार, गांधी मार्केट, शहरातील सर्व छोटे मोठे व्यापारी संकुल, एमआयडीसी परिसरातील लघुउद्योग भारती, जिंदा ,भाजप उद्योग आघाडी तसेच जिल्ह्यातील विविध व्यापारी व विक्रेते संघटना तसेच शाळा महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, फुटपाथ विक्रेते, सर्वांनी एकमताने या घटनेचा निषेध म्हणून एक दिवस कडकडीत दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले.

बंदची सुरुवात आरतीपासून –
जळगाव शहरातील सुभाष चौक येथील भवानी माता मंदिर परिसरात मोठ्या संख्येने हिंदू समाजातील विविध संघटनेतील लोक एकत्रित जमून भवानी मातेची सकाळी साडेनऊ वाजता आरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी 10.30 वा. अतिशय शांततेत तीन तीन लाईनीमध्ये तिथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला वर्गाचा देखील समावेश होता मोर्च्याची सुरुवात सुभाष चौक- दाना बाजार-टॉवर चौक शिवतीर्थ हेडगेवार चौक स्वातंत्र्य चौक तेथून कलेक्टर ऑफिस या मार्गाने हजारोच्या संख्येने मोर्चा कलेक्टर ऑफिसला धडकला.

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संबोधन –
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमलेल्या सर्व हिंदू बांधवांना महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी जी महाराज यांनी संबोधित केले. आज जी परिस्थिती बांगलादेशात होत आहे तीच परिस्थिती भारतात व्हायला वेळ लागणार नाही. यासाठीच या देशातला हिंदू हा जातीपातीमध्ये वर्ग न होता एकत्रितपणे संघटित राहणं खूप गरजेचं असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती यांना निवेदन द्वारे मागणी –
1) भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी योग्य ती पावले उचलावी.
2) बांगला देशातील भयावह परिस्थितीमुळे सीमेवर जमलेल्या हिंदू बांधवांसाठी भारत सरकारने छावण्या सुरू कराव्या.
3) गेल्या काही दिवसापासून देशात सुद्धा काही जिहादी मानसिक ते मुळे देशात असे कृत्य घडताना निदर्शनात येत आहेत या अशा विकृतींवर कठोर कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

यांची होती उपस्थिती –
महामहीम राष्ट्रपती यांना माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्याद्वारे निवेदन सादर करण्यात आले निवेदन सादर करताना महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज फैजपूर, ह.भ.प गजानन महाराज वरसाडेकर, ह.भ.प समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प दीपक महाराज, विहिंपचे प्रांत सहमंत्री ललित चौधरी, जिल्हाध्यक्ष हरीश मुंदडा, रा.स्व.सं. विभाग कार्यवाह अविनाश नेते , शहर संघ चालक उज्वल चौधरी, राकेश लोहार, अनिल अडकमोल, अमित भाटिया, डी. एन. तिवारी उपस्थित होते.

जळगावात बाईकच्या शोरूमवर दगडफेक –
आज जळगाव जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला असताना या मोर्चाला गालबोट लागल्याची दिसून आले. या मोर्चा दरम्यान काही तरुणांकडून उघडे असलेले बाईकच्या शोरूमवर दगडफेक करण्यात आल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भुसावळात भव्य निषेध मूक मोर्चा –
बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर तेथील बहुसंख्य समाजाकडून प्रचंड अत्याचार होत आहेत. या अत्याचाराचा निषेधार्थ भुसावळमधील सकल हिंदू समाजातर्फे भव्य निषेध मूक मोर्चाचे आज 16 ऑगस्ट रोजी ओयजन करण्यात आले. आज सकाळी 10 वाजता भुसावळातील अष्टभुजा देवी मंदिर जामनेर रोड येथून हा मोर्चा निघाला. यावेळी हजारो नागरिक मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

पाचोऱ्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद –
बांगलादेशातील हिंदू बांधवावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा बंद करण्याचे आव्हान करण्यात आले असताना सकल हिंदू समाजाच्यावतीने पाचोरा शहर व तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बंद दरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाचोरा पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी होमगार्ड यांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला.

पारोळ्यात सकल हिंदू समाजाचा मोर्चा –
पारोळा शहरात सकल हिंदू समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात तरूणाई उपस्थित होते. तरूणाईच्यावतीने घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी?, केंद्रीय निवडणूक आयोगाने कारण सांगितले, काय आहे संपुर्ण बातमी? 

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsprotest march in jalgaon districtsakal hindu samajsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी जागा राखीव; कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही – मंत्री दादाजी भुसे

आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी जागा राखीव; कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही – मंत्री दादाजी भुसे

March 20, 2026
शेतकऱ्यांना केळीचा योग्य दर मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येतील – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

शेतकऱ्यांना केळीचा योग्य दर मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येतील – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

March 20, 2026
शेतकरी हा अन्नदाता असून देवासमान; रासायनिक खतांचा अतिरेक थांबवून नैसर्गिक शेतीकडे वळणे ही काळाची गरज – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

शेतकरी हा अन्नदाता असून देवासमान; रासायनिक खतांचा अतिरेक थांबवून नैसर्गिक शेतीकडे वळणे ही काळाची गरज – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

March 20, 2026
आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

आजपासून पुण्यातील वाघोलीत रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा थरार; पाचोऱ्याचा पहिलवान हितेश पाटील स्पर्धेत सहभागी

March 18, 2026
राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

March 18, 2026
महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महावितरणच्या विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षांत वीजदर कमी होतील; 2029 पर्यंत वीजदरात स्थिरता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page