• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 3, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, रावेर
रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

रावेर, 3 एप्रिल: जळगाव जिल्ह्याची ओळख असलेल्या केळी पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती तसेच निर्याताभिमुख मूल्यसाखळी प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी रावेर तालुक्यातील अटवाडे येथे प्रगतशील शेतकरी वरुण अग्रवाल यांच्या केळी बागेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या क्षेत्रभेटीद्वारे केळी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी केलेले प्रयोग तसेच कापणीपश्चात व्यवस्थापनाची प्रक्रिया यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी केळी लागवडीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक मल्चिंग, गादीवाफा (Raised Bed) पद्धत, योग्य लागवड अंतर, तसेच दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादन मिळण्यासाठी वापरले जाणारे ‘बड इंजेक्शन’ तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती घेतली. आधुनिक मशागत तंत्रज्ञानाचा वापर करून पिकाची उत्पादकता वाढविणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आणि रोग-कीड नियंत्रण अधिक प्रभावीपणे करणे यासाठी या पद्धती कशा उपयुक्त ठरतात याबाबतही चर्चा करण्यात आली.

तसेच शेतात केळी घडांची शास्त्रोक्त पद्धतीने होणारी कापणी, त्यानंतरची वर्गवारी (ग्रेडिंग), स्वच्छता, पॅकिंग आणि निर्यातीसाठी तयार होणारी प्रक्रिया यांचेही जिल्हाधिकाऱ्यांनी बारकाईने निरीक्षण केले. शेतातून थेट बाजारपेठेपर्यंत पोहोचणाऱ्या ‘व्हॅल्यू चेन’ प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा उत्पादनाच्या गुणवत्तेसाठी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धात्मक स्थान मिळविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधताना रोहन घुगे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि मूल्यवर्धन यावर भर दिला. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या (FPC) माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन प्रक्रिया उद्योग, पॅकिंग, साठवणूक व निर्यात याकडे लक्ष दिल्यास केळी पिकाला अधिक शाश्वत आणि चांगला बाजारभाव मिळू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादनाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी असून रावेर परिसरातील शेतकऱ्यांनी आत्मसात केलेल्या आधुनिक पद्धतीमुळे या पिकाची गुणवत्ता अधिक सुधारत आहे. तंत्रज्ञानाचा वापर, योग्य व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन यामुळे जळगावची केळी जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करत असून ही प्रगत शेती पद्धती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या समावेत कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 8 महिला कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

बातमी शेअर करा !
Share
Tags: banana farmingias rohan ghugejalgaon dm rohan ghugejalgaon newsmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

रावेरमध्ये आधुनिक केळी शेती व मूल्यवर्धन प्रक्रियेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

April 3, 2026
पाचोरा तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप आणि प्रिंटरचे वाटप

पाचोरा तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप आणि प्रिंटरचे वाटप

April 3, 2026
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 8 महिला कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 8 महिला कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

April 2, 2026
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

April 2, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

April 2, 2026
जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव

जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव

April 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page