जळगाव : जळगाव येथील औद्योगिक वसाहतीमधील सिद्धिविनायक इंडस्ट्रियल डी 66/1 येथील प्लास्टिक चटई कंपनी व सूर्यफूल बियाणे असलेल्या कंपनीला रविवार (दि.29) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आगीत लागली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोहचताच आगेवर फोम व पाणीचा मारा करत अग्निशमन कर्मचार्यांनी आग आटोक्यात आणली.
जळगाव शहर महानगरपालिका जळगाव यांच्या तीन गाड्या, जामनेर नगरपालिका, भुसावळ नगरपालिका, वरणगाव नगरपालिका, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी, भुसावळ ऑडनस फॅक्टरी व जैन इरिगेशनच्या दोन गाड्यांच्या सहाय्याने (फायर फायटर) आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 5 वाजेपर्यंत अग्निशमन कार्य सुरू होते. या आगीत कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, उपअधीक्षक (गृह) संदीप, अग्नीशमन अधिकारी मनपा शशिकांत बारी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली व कर्मचाऱ्यांना सुचना केल्या.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी शशिकांत बारी, अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे, वाहन चालक निवांत इंगळे, देविदास सुरवाडे, नंदकिशोर खडके, नासिर अलीदादा, संजय भोईटे, भारत बारी, विजय पाटील, पन्नालाल सोनवणे, तेजस जोशी, मनोज तिरवड, हर्ष शिंदे, नितीन ससाने, निलेश सुर्वे, गिरीश खडके, सरदार पाटील, योगेश कोल्हे या सर्वांनी आग विझवण्यास मदत केली.