चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 20 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली असून पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. दरम्यान, जळगाव पोलिसांनी जिल्ह्याच्या इतिहासातील ड्रग्जप्रकरणी आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई केली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
जळगाव जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई करत भुसावळ येथून तब्बल 73 लाखांचे 910 ग्रॅम एवढ्या एमडी ड्रगचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली. दरम्यान, जळगाव जिल्ह्याच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पोलिसांनी केली आरोपींना अटक –
पोलिसांनी भुसावळ शहरातीलच रहिवासी असलेल्या तीन आरोपींना याप्रकरणात अटक केली आहे. कुणाल भारत तिवारी (वय 30), जोसेफ जॉन वाल्याड्यारेस व दीपक मुकेश मालवीय अशी अटकेतील तिघा आरोपींची नावे आहेत. या तिघांकडून तब्बल 910 ग्रॅम एवढे 73 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई –
जळगाव जिल्ह्याचे इतिहासातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलीस अधीक्षक महेश्र्वर रेड्डी यांनी सांगितले. दरम्यान, मोठी कारवाई करणाऱ्या पोलिसांच्या पथकाला पोलीस अधीक्षकांकडून 20 हजार रुपयांचा रिवार्ड देण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा : शुभम गुप्ता जळगाव जिल्हा परिषदेचे नवीन CEO, अंकित यांची अवघ्या 9 महिन्यातच झाली बदली