पुणे, 3 सप्टेंबर : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात ‘पोलिसनामा’ या न्यूज पोर्टलचे वरिष्ठ वार्ताहर प्रसाद गजानन गोसावी यांच्या अवयव दानाच्या निर्णयाने लष्करी जवानाला जीवनदान मिळालंय. पत्रकार प्रसाद गोसावी यांचा पावणेदोन महिन्यांपूर्वी गंभीर अपघात झाला होता. दरम्यान, त्यांच्यावर निगडीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रसाद गोसावी यांची 1 सप्टेंबर रोजी अखेर मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली अन् त्यांचे निधन झाले.
लष्करी जवानाला ह्रदय दान –
प्रसाद यांचे अवयव दान करण्यात आले. प्रसाद गोसावी यांच्या मृत्यूनंतर काही तासातच त्यांच्या हृदयाचे दुसऱ्या एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आले. हृदयाबरोबरच दोन फुफ्फुसे, यकृत, दोन डोळे व एक मूत्रपिंड या अवयवांचेही दान करण्यात आले. त्यामुळे एकूण पाच रुग्णांना नवीन जीवन मिळालंय. दरम्यान, या स्तुत्य निर्णयामुळे प्रसाद गोसावी हे अवयवदान करणारे पहिले पत्रकार ठरले आहेत.
नेमकं काय घडलं होतं? –
प्रसाद गोसावी हे पोलीसानामा या न्यूज पोर्टलचे वरिष्ठ वार्ताहर म्हणून काम करत होते. प्रसाद यांच्या दुचाकीला सव्वा महिन्यांपूर्वी ऑफिसमधून घरी येत असताना खडकी रेल्वे स्टेशनजवळ गंभीर अपघात झाला होता. त्यांच्यावर पुण्यातील निगडीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या अपघातात त्याच्या मेंदूला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असताना त्यांचा जीव वाचवण्याचे आव्हान डॉक्टरांच्या पुढे होते.
दरम्यान, उपचार सुरु असतानाच पायाच्या संवेदना नाहीशा झाल्यामुळे दुर्दैवाने त्यांचा उजवा पाय पोटरीपासून काढण्याचा निर्णय घ्यावा लागला. कारण, त्याचा जीव वाचणे महत्वाचे होते. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत असतानाच अचानक मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याची शुद्ध हरपली. दरम्यान, उपचार सुरू असताना त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर, डॉक्टरांनी प्रसाद ब्रेनडेड झाल्याचे घोषित केले.
अन् निधनानंतर अवयवदानाचा निर्णय –
प्रसाद गोसावी यांच्या परिवार त्यांच्या निधानाने दुःखाचा डोंगर कोसळला असताना देखील त्यांना प्रसादचे अवयदान करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रसादचे डोळे, हृदय, दोन फुप्फुसे, वकृत्व एक किडनी हे अवयव काढून घेण्यात आले. दरम्यान, प्रसाद यांच्या मृत्यूनंतर काही तासातच त्यांच्या हृदयाचे दुसऱ्या एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आलं. यामुळे प्रसाद जरी या जगात नसतील तरी त्यांचे ह्रदय अजूनही धडधडत असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहे.
हेही वाचा : “जळगाव दूध संघात आता लाडका साडू योजना अन् कोट्यवधींचा काळाबाजार,” माजी खासदार उन्मेश पाटील यांचा आरोप