जळगाव, 24 एप्रिल : महाविकास आघाडीकडून जळगाव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करण पवार तर दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या पार्श्वभूमीवर जळगावात महाविकास आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले.
महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल –
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून महायुती व महाविकास आघाडीकडून जोरदार रणनिती आखण्यात येत आहे. दरम्यान, आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जळगाव शहरात रॅली काढत महाविकास आघाडीने जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन –
महाविकास आघाडीकडून उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जोरदार भाषणे करत महायुतीवर जोरदार टीका केली. यावेळी ठाकरे गटाचे संजय राऊत, संजय सावंत, वैशाली सुर्यवंशी तसेच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील तसेच जिल्ह्यातील ठाकरे गट व शरद पवार गटाचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : अखिल भारतीय ओबीसी महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत दुसाने यांची नियुक्ती