मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 21 जानेवारी : चोपडा एज्युकेशन सोसायटीच्यावतीने देण्यात येणारा संध्याताई मयूर प्रज्ञावंत पुरस्कार मिनाक्षी वसाने यांना प्रदान करण्यात आला. चोपडा शहरातील चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या प्रताप विध्या मंदिराच्या 107 वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात मिनाक्षी वसाने यांना सन्मानित करण्यात आले आहे.
मिनाक्षी वसाने यांना संध्याताई मयूर प्रज्ञावंत पुरस्कार प्रदान –
चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या प्रताप विध्या मंदिराच्या 107 वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात दरवर्षी अनेक शिक्षकांना संध्याताई मयूर प्रज्ञावंत पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. दरम्यान, यावर्षी छोट्या प्रताप विध्या मंदिराच्या शिक्षिका मिनाक्षी मोहन वसाने यांना यंदाचा संध्याताई मयूर प्रज्ञावंत पुरस्कार देण्यात आलाल. मिनाक्षी वसाने यांना संस्थेचे सचिव माधुरिताई मयूर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे प्रसिद्ध लेखक प्रा.मिलिंद जोशी तसेच इतर मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप 11,000 रुपये रोख बक्षीस आणि स्मृती चिन्ह प्रदान करण्यात आले.
पुरस्कार वितरणाच्या वेळी प्रताप विद्या मंदिराचे चेअरमन राजाभाई मयूर तर शहरातील पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, विश्वनाथ अग्रवाल, पिपल्स बँकेचे निवृत्त मॅनेजर श्री जैन, भूपेंद्र गुजराथी, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होत. यासोबतच प्राथमिक विभागाचे मुख्यध्यापक सुनिल पाटील, पी पी पाटील, प्रताप विध्या मंदिराचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा : धक्कादायक! अज्ञात वाहनाच्या धडकेत काका-पुतण्या ठार, पाचोऱ्यातील नेमकी घटना काय?