जळगाव, 10 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच जळगाव एसीबीकडून कारवाईंचा धडका सुरू असताना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लाचखोरीबाबत स्पष्ठ शब्दात मत व्यक्त केलं आहे.
मंत्री गुलाबराव पाटलांनी सरकार कर्माचाऱ्यांना सुनावलं –
जळगावात पत्रकारांसोबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, लाच कोणत्या विभागाने घेतली हे महत्वाचे नसून लाच ही लाचच असते. लोकांना जर त्रास होत असल्यामुळे लोक या मार्गावर जात असतात. त्यामुळे सगळ्या अधिकारी-कर्माचाऱ्यांना आमच्या सूचना आहेत की, कमीत कमी आलेल्या माणसांचे समाधान करा. वाजवी पैशांपेक्षा जास्त पैसे तुम्ही त्यांच्याकडे मागतात. खरंतर, पैसे मागणे हाच कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे लाचलुचपत विभागाकडे कुणाची जाण्याची मानसिकता होऊ नये, असे सरकारी कर्मचाऱ्यांनी वागले पाहिजे.
लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ –
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. या लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये शासकीय विभागात कुठलंही काम अडलं असेल तर थेट पैशांची मागणी केली जात असते. परिणामी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांच्या पथकाद्वारे देखील मोठ्या प्रमाणात कारवायांचा धडाका सुरू आहे.
हेही वाचा : Video : “…त्यांना मी सोडणार नाही!” मंत्री गुलाबराव पाटील यांचा देवकर यांना गंभीर इशारा, नेमकं काय म्हणाले?