• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Video : “आता हा येतच नाही; हा गेला म्हणे डब्यात, पण लोकांनी…” पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच नेमकं वक्तव्य काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 13, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, यावल
Video : “आता हा येतच नाही; हा गेला म्हणे डब्यात, पण लोकांनी…” पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच नेमकं वक्तव्य काय?

जळगाव, 13 एप्रिल : विधानसभा निवडणुकीतील हवाच वेगळी होती. मलाही वाटायचं की माझं काही खरं नाही. अनेक जण म्हणायचे की आता हा येतच नाही; हा गेला म्हणे डब्यात. पण लोकांनी मोठ्या प्रमाणात मताधिक्य देत निवडून दिले. खरंतर, महायुती ज्यापद्धतीने घट्ट होती..त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला, असे वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. ममुराबाद-विदगाव-किनगाव मार्गावरील काँक्रीट रस्त्यांचे भूमिपूजन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

गुलाबराव पाटील काय म्हणाले?
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, लाडक्या बहिणींनी देखील मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिले. जरी ती बहिण काँग्रेसची होती. 1500 कडे पाहून तिने बरोबर आम्हाला मते दिली. जरी तिला नवऱ्याने सांगितले तरी जो 1500 देईल तो आपला भाऊ, अशापद्धतीने मतांची टक्केवारी जर पाहिली तर महिलांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मताधिक्य दिले. खरंतर, महायुतीने देखील महिलांसाठी बसमध्ये 50 टक्के सवलत, लाडकी बहिण योजना, लखपती दिदी, महिला सक्षमीकरण अशा योजना राबविल्यामुळे महिलांचा कल आमच्याकडे राहिला.

दरम्यान, जळगाव ग्रामीण किंवा चोपडाच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातील 11 चा जागा तसेच दोघंही खासदार यासोबतच केंद्रात एक राज्यमंत्रीपद तसेच राज्यात 3 कॅबीनेटमंत्री असे एकाचवेळी चार मंत्रीपदे मिळाले. एवढं आपल्या जळगाव जिल्ह्याला मागच्या काळात कोणीच दिलं नाही, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

मंत्रीपदाबाबत काय म्हणाले? –
मला मंत्रीपद मिळेल की नाही, याबाबत मला देखील शाश्वती नव्हती. कारण, वाटा पाडणारे तीन आणि निवडून आलेले 237. मागच्या वेळेस सव्वा चार आमदारांमागे एक मंत्री होता आणि यावेळेस सव्वा सात आमदारांमागे एक मंत्री अशी स्पर्धा होती. मात्र, ‘कुछ भी हो जाओ; पण गुलाबराव पाटील मंत्री झाले पाहिजे’ अशापद्धतीने सर्वजण माझ्या पाठीशी उभे राहिले, असे गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या मंत्रीपदाबाबत सांगितले.

ममुराबाद-विदगाव-किनगाव मार्गावरील काँक्रीट रस्त्यांचे भूमिपूजन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याबाबत बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, राज्य शासनाच्या हायब्रीड ॲन्युटी योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेले हे रस्ते केवळ वाहतुकीचे साधन नसून गावाचा आत्मविश्वास वाढवणारे माध्यम आहेत. “रस्ते म्हणजे विकासाची रक्तवाहिनी असून, हे रस्ते स्थानिक जनतेसाठी वरदान ठरणार आहेत. ते विकासाच्या नव्या युगाची नांदी ठरतील.

दरम्यान, जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होणारे रस्ते अत्यंत महत्त्वाचे असून, हायब्रीड ॲन्युटी योजनेच्या माध्यमातून निधीची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे ठेकेदारांनी रस्त्यांचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे, असा स्पष्ट इशारा देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिला.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपीट; केळी व मका पिकांचे मोठे नुकसान, पालकमंत्र्यांनी दिले तत्काळ पंचनाम्याचे निर्देश

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsmarathi newsminister gulabrao patilsuvarna khandesh livevidhansabha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jalgaon News: परीक्षा काळात ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

Jalgaon News: परीक्षा काळात ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचे महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

February 12, 2026
महाराष्ट्र सरकारचे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत महत्वाचे करार; या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

महाराष्ट्र सरकारचे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत महत्वाचे करार; या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

February 12, 2026
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान शिवजयंती उत्सव

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन; 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान शिवजयंती उत्सव

February 12, 2026
फार्मर कप प्रशिक्षणासाठी शेतकरी रवाना; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दाखवला बस ला हिरवा झेंडा

फार्मर कप प्रशिक्षणासाठी शेतकरी रवाना; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दाखवला बस ला हिरवा झेंडा

February 12, 2026
जळगाव जिल्हा परिषदेला राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये मानाचे स्थान; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यस्तरावर अव्वल

जळगाव जिल्हा परिषदेला राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये मानाचे स्थान; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यस्तरावर अव्वल

February 11, 2026
BMC Mayor : मुंबईला पहिल्यांदाच भाजपचा महापौर; रितू तावडेंनी स्वीकारला पदभार, अधिकृतपणे निवड झाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

BMC Mayor : मुंबईला पहिल्यांदाच भाजपचा महापौर; रितू तावडेंनी स्वीकारला पदभार, अधिकृतपणे निवड झाल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

February 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page