• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उत्तर महाराष्ट्रातले सर्वाधिक अत्याधुनिक यंत्रसामुग्रीनी सज्ज रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होतेय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 26, 2024
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
उत्तर महाराष्ट्रातले सर्वाधिक अत्याधुनिक यंत्रसामुग्रीनी सज्ज रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होतेय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, 26 सप्टेंबर : आपण ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यास प्राधान्य दिले आहे. मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाचे लोकार्पण हे आरोग्य सेवेत एक महत्त्वपूर्ण पावले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी मागच्या चार वर्षात जिल्हा वार्षिक नियोजन मधून अत्याधुनिक करणासाठी नव्या तंत्रज्ञानाने सज्ज असलेले यंत्र सामुग्री दिले आहेत. आज त्यात अत्याधुनिक जळीत उपचार वॉर्डची भर पडली. उत्तर महाराष्ट्रातलं सर्वाधिक अत्याधुनिक रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होत आहे. डीपीडीसीतून दिलेल्या मोठ्या निधीमुळे सिव्हील हॉस्पिटल व महाविद्यालयाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलला असल्याने सर्वसामान्यांना आपल्या हक्काचे हॉस्पिटल वाटत असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते सिव्हिल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय येथे मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. स्मिताताई वाघ होत्या.

हेही पाहा : Jalgaon Police : चिमुकल्याला वाचविण्यासाठी पोलीस तरूणीने नदीत घेतली उडी, जळगावात नेमकं काय घडलं?

सुसज्ज असे जळीत कक्ष व अतिदक्षता विभाग –
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील अत्याधुनिक जळीत उपचार वॉर्डचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व आणि खा. स्मिता वाघ यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा 20 खाटांच्या जळीत कक्षात ( बर्न वार्ड) 5 खाटांचे आयसीयू, 5 विशेष जळीत खाटा आणि उर्वरित 10 जनरल जळीत खाटांचा समावेश असून येथील सर्व खाटा जळालेल्या रुग्णांसाठी राखीव आहेत. या अत्याधुनिक वार्डामध्ये वातानुकूलित (ए.सी.) सोयीसह रुग्णांना अधिक आरामदायी उपचार मिळत असून याशिवाय स्क्रीन ग्राफ्टिंगसारख्या जटिल शस्त्रक्रिया आणि हायड्रोशन सारख्या आधुनिक उपचार पद्धती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच सदर कक्षामध्ये एक सुसज्ज असे लहान शस्त्रक्रिया गृह देखील उपलब्ध आहे ज्यामुळे जळालेल्या रुग्णांच्या उपचाराची गुणवत्ता अधिक वाढेल. जंतुसंसर्ग कमी होणे, मृत्यूचे प्रमाण कमी होणे व रुग्ण बरा झाल्या व नंतरचे व्यंग/ विद्रूपपणा हे सर्व कमी होण्यास मदत होईल. डीपीडीसीच्या माध्यमातून एकूण 03 कोटी 60 लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे.

यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा नियोजन समिती सदस्य राधेश्याम अग्रवाल, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, सिव्हील सर्जन डॉ. किरण पाटील, उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. अक्षय सरोदे डॉ., डॉ. सुरेखा चव्हाण डॉ. राजेश जांभुळकर वैद्यकीय अधीक्षक, डॉ. विजय गायकवाड, योगिता बावस्कर, विश्वनाथ पुजारी दीपक शेजवळ, राजेश जांभूळकर, डॉ. चंद्रमोहन हरणे तसेच अधिसेविका प्रणीता गायकवाड, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. समीर चौधरी तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व त्या विभागातील डॉक्टर्स मेट्रन मॅडम व इतर नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी DPDC मार्फत देण्यात आलेल्या मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागासाठी यंत्रसामुग्री बाबत सविस्तर माहिती विषद करून यामुळे रुग्णांना होणारे फायदे याबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे यांनी केले. आभार वैद्यकीय अधीक्षक, डॉ. विजय गायकवाड यांनी मानले.

हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview

बातमी शेअर करा !
Share
Tags: burnt ward jalgaon jalgaon newsgmc jalgaonminister gulabrao patilsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

SIT formed in the murder case of a minor boy in Erandol, orders from Jalgaon Superintendent of Police

मोठी बातमी!, एरंडोलमधील अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणी SIT स्थापन, जळगाव पोलीस अधीक्षकांचे आदेश, आतापर्यंत काय काय घडलं?, संपूर्ण माहिती

June 28, 2025
पाचोरा येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन

पाचोरा येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन

June 27, 2025
“Thackerey is the Brand!” हिंदी सक्तीच्याविरोधातील मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार; संजय राऊतांच्या ‘एक्स’ पोस्टनं वातावरण तापलं!

“Thackerey is the Brand!” हिंदी सक्तीच्याविरोधातील मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार; संजय राऊतांच्या ‘एक्स’ पोस्टनं वातावरण तापलं!

June 27, 2025
धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांतर्गातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनात वाढ देण्याची मागणी; कामगार मंत्र्यांना मंत्रालयात निवदेन

धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांतर्गातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनात वाढ देण्याची मागणी; कामगार मंत्र्यांना मंत्रालयात निवदेन

June 27, 2025
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शालेय साहित्याचे वाटप

पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत शालेय साहित्याचे वाटप

June 27, 2025
मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

June 26, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page