जळगाव, 16 फेब्रुवारी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र, यासोबतच उद्योगमंत्री उदय सामंत आणि बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसेही आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दौऱ्याचा कार्यक्रम असा राहणार –
दुपारी 2.55 वाजता – विमानाने जिल्हा सिंधुदुर्ग येथून जळगाव विमानतळ येथे आगमन व तेथून हेलिकॉप्टरने भोकर हेलिपॅड. ता जळगावकडे प्रयाण
दुपारी 3.10 वाजता – भोकर हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण
दुपारी 3.15 वाजता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत तापीनदीवरील उंज पूल व जोड रस्त्याचे भूमिपुजन व विविध विकासकामांचे ई-भूमीपूजन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ – भोकर.
दुपारी 4.30 वाजता – भोकर येथून मोटारीने जळगावकडे प्रयाण
सायंकाळी 5.00 वाजता – उद्योग विभाग व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जळगाव जिल्हा विकास परिषद कार्यक्रमास उपस्थिती
स्थळ – छत्रपती संभाजी महाराज नाट्यसंकुल, जळगाव
सायंकाळी 6.30 वाजता – उद्योग विबाग व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीच्या जळगाव कार्यालयाचे उद्घाटन.
स्थळ 21/अ, श्रीराम स्टेट बँक कॉलनी, एलआयसी कॉलनी जवळ, रिंगरोड, जळगाव
रात्री 8.30 वाजता – मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण
रात्री 9.00 वाजता – जळगाव विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, काय आहे कारण?
मंत्री दादा भुसे यांचा जळगाव जिल्हा दौऱ्या कार्यक्रम असा राहणार –
सकाळी 11.00 वाजता – शासकिय वाहनाने मालेगाव येथून भोकर (धुळे-अमळनेर मार्गे) जि. जळगावकडे प्रयाण.
दुपारी 2.45 वाजता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत तापीनदीवरील उंज पूल व जोड रस्त्याचे भूमिपुजन व विविध विकासकामांचे ई-भूमीपूजन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ – भोकर.
सायंकाळी 5.00 वाजता – भोकर येथून धरणगावमार्गे पारोळाकडे प्रयाण.
सायंकाळी 6.00 वाजता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत पारोळा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व जाहीर मेळाव्यास उपस्थिती
स्थळ – एन.ई.एस हायस्कूल पटांगण, पारोळा. जि. जळगाव
सायंकाळी 7.30 वाजता – राखीव
रात्री 8.00 वाजता – एन.ई.एस हायस्कूल पटांगण, पारोळा येथून शासकीय वाहनाने धुळेमार्गे मालेगावकडे प्रयाण.
रात्री 10.30 वाजता – मालेगाव येथे आगमन, राखीव व मुक्काम.