पाचोरा, 7 नोव्हेंबर : दलित बहुल भागातील आंबेडकरी अनुयायांनी मला दिलेल्या प्रेमामुळे भारावून गेलो असून हा अनुभव माझ्या राजकीय जीवनातील अविस्मरणीय आहे. पक्षभेद जातीभेद याला मी कधीही थारा दिला नसून माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाचे काम मार्गी लावण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे..त्यामुळे जनतेतून मिळणाऱ्या या प्रेमाच्या मी कायम ऋणात राहणार असल्याचे भावोद्गार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी व्यक्त केले. पाचोरा शहरातील जनता वसाहत येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पाचोरा व भडगाव शहरातील सुमारे 7 हजार अतिक्रमित घरे नावावर लावण्याची प्रक्रिया आपण सुरू केली असून यासाठी लागणारी मोजणी फी भरून पहिल्या टप्पाचे काम मार्गी लागले आहे.या अगोदर काँग्रेसी राजकारण्यांनी दलित वस्त्यांमध्ये विकासाची कामे न करता याकडे केवळ राजकीय मतांसाठी पाहिले होते.मात्र आम्ही या भागातील रस्ते,गटारी आणि चौक सुशोभिकारण करून हा परिसर सुंदर केला.गरीबा घरची चूल पेटली पाहिजे म्हणून लाडपागे समितीच्या शिफारशी तात्काळ लागू करण्यासाठी शासन दरबारी जोरदार पाठपुरावा केला आणि हक्काच्या नोकरीची वाट पाहणाऱ्या वारसांना त्यांचा हक्क सहजपणे मिळवून दिला.मी ही कामे राजकारण करण्यासाठी नाही तर समाजसेवेच्या भावनेतून केल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.
यावेळी मंचावर आमदार किशोर आप्पा पाटील ,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बाजार समिती सभापती गणेश पाटील,शिवसेना प्रवक्ते प्रदीप देसले, प्रवीण ब्राह्मणे,माजी जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, माजी नगरसेवक दत्ता जडे, अविनाश सावळे संगीता पगारे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर शहर प्रमुख सुमित सावंत, बाजार समिती संचालक प्रकाश तांबे,सुनील पाटील,रवींद्र पाटील सचिन पाटील, विजय राठोड, राजेंद्र खर्चाने, विकी बाविस्कर,उमेश निकाम, सनी साठे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण ब्राम्हणे, संगीता साळुंखे, स्मिता भीवसने, माया केदार, भीमराव खैरे सुनील कदम यांनी समयोचीत बोलतांना आमदार किशोर पाटील केलेल्या समजाभिमुख विकास कामं बद्दल कृतज्ञता केली.आमदारांनी त्यांच्या कार्य कर्तुत्वातून जनमाणसात आदराचे स्थान निर्माण केलेले आहे. त्यामुळे ते मोठ्या मताधिक्याने तिसऱ्यांदा विधानसभेत निवडून जातील असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भावडू जाधव, संतोष पाटील,अनुराग खेडकर,जयेश तायडे,मनोज नन्नवरे, सचिन केदार मयूर ब्राह्मणे,आकाश थोरात, सागर अहिरे, विकास थोरात, शुभम खर्चाने, विजय सावळे, विजय गायकवाड, सचिन नन्नवरे, गोलू खैरनार,विशाल पवार,तन्मय ब्राह्मणे यांनी परिश्रम घेतले.
विरोधकांसाठी मोतीबिंदू शिबिर घेणार –
आपण पाचोरा भडगाव मतदार संघात अतिशय प्रामाणिकपणे काम करत सर्वच समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतानाच सुमारे 3000 कोटी रुपयांचा विकास निधी आणून मतदारसंघ विकसित करण्याचे काम केले आहे.मात्र विरोधक आपण कोणतेही काम केले नसल्याची टीका करत आहेत आपण केलेली विकास कामे त्यांना दिसत नसल्याने निवडणुकीनंतर मी विरोधकांसाठी खास मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करणार असून स्वखर्चाने विरोधकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून देणार असल्याची मिश्किल टीका सुद्धा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी केली.