चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 4 फेब्रुवारी : व्यक्तिगत लाभांच्या योजना या सर्व गोरगरिबांच्या योजना आहेत. अशिक्षित लोकांच्या योजना आहेत. या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अनेक प्रकारच्या हालअपेष्ठा भोगाव्या लागतात. इथे (पाचोरा, भडगाव) आल्यानंतर अनेक एजंट, दलाल किंवा ब्रोकरच्या माध्यमातून त्यांना या गोष्टींकरता सामोरे जावे लागते. मात्र, असे असूनही अनेक वर्षे उलटूनही लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही. तो कायमस्वरुपी वंचित असतो, असे सांगत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघातील जनतेसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
आज पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील ज्या ज्या विभागांच्या व्यक्तिगत लाभांच्या योजना आहेत, त्या सर्व विभागांच्या सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक प्राताधिकारी भुषण अहिरे, पाचोरा आणि भडगाव तालुक्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व विभागाचे प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
काय म्हणाले आमदार किशोर आप्पा पाटील –
याबैठकीत बोलताना आमदार किशोर पाटील म्हणाले की, या बैठकीचा उद्देश्य असा आहे की, या व्यक्तिगत लाभांच्या योजना या सर्व गोरगरिबांच्या योजना आहेत. अशिक्षित लोकांच्या योजना आहेत. या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अनेक प्रकारच्या हालअपेष्ठा भोगाव्या लागतात.
इथे आल्यानंतर अनेक एजंट, दलाल किंवा ब्रोकरच्या माध्यमातून त्यांना या गोष्टींकरता सामोरे जावे लागते. मात्र, असे असूनही अनेक वर्षे उलटूनही लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही. तो कायमस्वरुपी वंचित असतो. अशा या सर्व गोष्टी कानावर आल्यानंतर आज सर्व विभागांच्या सर्व प्रमुखांची बैठक घेतली.
या बैठकीत असा निर्णय घेतला की, MSW (मास्टर ऑफ सोशल वर्क) झालेल्या 15 तरुणांना मी माझ्या स्वत:च्या कार्यालयात नियुक्त केले आहे. त्या सर्वांना वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी देऊन सर्व अधिकाऱ्यांना ज्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक लाभांच्या योजनांची माहिती किंवा जीआर देण्याबाबत सूचना केलेल्या आहेत.
पाचोरा आणि भडगाव येथील आमदार कार्यालय या कार्यालयातून एक खिडकी योजनेसारखे आपल्या माध्यमातून पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम जनतेला आमदार या नात्याने आव्हाने ज्याला कळत असेल ते सरळ तहसील किंवा सर्व विभागात गेले तरी काही अडचण नाही. पण ज्याला जी अडचण येत असेल त्याने इकडे तिकडे न फिरता सरळ माझ्या आमदाराच्या कार्यालयात यावे तिथे मी नेमून दिलेल्या व्यक्तींना भेटावे, आणि त्यांनी दिलेल्या सर्व चेकलिस्टप्रमाणे, सर्व कागदपत्रांची पूर्तता तिथे करुन द्यावी.
यामध्ये प्रत्येक विभागाला आपण 8 दिवस, 15 दिवस असा काही वेळ दिलेला आहे. या 15 दिवसाच्या आत लाभार्थ्याकडून करण्यात आलेली मागणी ही संबंधित विभागाकडून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवली जाईल, अशा पद्धतीची व्यवस्था आपण करण्याचे ठरवले आहे, अशी माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली.
मी नियुक्त केलेले तरुण हे फक्त माझे सहकारी नाही तर सर्व विभागांचे दूत म्हणून काम करतील आणि या माध्यमातून दोन्ही तालुक्यातील तमाम जनतेची सेवा करतील अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. याचे पालन सर्व अधिकारी आणि ते सर्व दूत, सहकारी करुन पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील जनतेच्या सेवेत येणाऱ्या दोन दिवसात ते रुजू होतील. या सुवर्णसंधीचा सर्व जनतेने लाभ घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेला केली.
हेही पाहा : Video : ‘छत्रपती शिवाजी महाराज, भगवद्गीता यांचं आयुष्यात मोठं स्थान’, Kho Kho Team Captain Pratik Waikar