अमरावती, 12 ऑगस्ट : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारकडून महिलांना लाडकी बहिण योजनेअंतर्गत प्रति महिना 1500 रूपये देण्यात येतील, अशी घोषणा करण्यात आली. यानंतर या लाडकी बहिण योजनेची राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. विरोधक देखील राज्य सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच आमदार रवी राणा यांनी लाडकी बहिण योजनेबद्दल मोठ वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले आमदार रवी राणा? –
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमानपत्र वितरण सोहळा आज अमरावती येथे आमदार रवी राणा यांनी घेतला होता. दरम्यान, या कार्यक्रमात आमदार रवी राणा म्हणाले की, आमचे सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयेचे हे आम्ही दुप्पट म्हणजे 3 हजार रुपये करू. आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार. दरम्यान, ज्याचं खाल्लं त्याचे जागले पाहिजे. सरकार देत राहते, पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असे रवी राणा यांनी सांगितले. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित असल्याने या विधानाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
लाडकी बहिण योजनेचे ‘या’ दिवशी येणार पैसे –
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्यापासूनच राज्यभरातील महिलांनी योजनेसाठी अर्ज सुरूवात केली. यामध्ये अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचे देखील पाहायला मिळाले. अशातच आता राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यात कधी येणार, याची आतुरता लागली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या 17 ऑगस्ट रोजी राज्यातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होणार असल्याचे सांगितलंय.
हेही वाचा : Unmesh Patil Interview : ‘एकतर नार-पार नाहीतर हद्दपार…’, उन्मेश पाटील यांची Exclusive मुलाखत