मुंबई, 9 फेब्रुवारी : राज्यात नुकत्याच राजकीय क्षेत्रातील व्यक्तींवर झालेल्या गोळीबाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ट्विटरच्या ऑफिशिअल पेजवर राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिसांना 48 तासांची मोकळीक द्या, अशी मागणी या व्हिडिओत करण्यात आली आहे.
मनसेकडून व्हिडिओ ट्विट –
मुंबईतील दहिसरमध्ये काल ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची गोळीबारात झालेल्या हत्येनंतर मनसेकडून ट्विटरवर राज ठाकरे यांचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत राज ठाकरे यांनी म्हटल्यानुसार, आपल्या देशात कायदे आहेत. फक्त कायदा आहे, मात्र आदेश नाहीत. आदेशाची वाट पाहता आहेत. जर आदेश मिळाले तर माझा मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या हातात 48 तासांची मोकळीक द्या आणि मला महाराष्ट्र साफ करून द्या, असे सांगा. सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात फक्त आदेश नसतात मग रिस्क कोण घेईल, असेही त्यांनी म्हटले होते.
राज्यातील बेछूट गोळीबार, टोळीयुद्ध, गुन्हेगारांचा मुक्त संचार, कोयता गॅंगचा उच्छाद, मुलींचं अपहरण हे गुन्हे थांबवायचे असतील तर महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या… #बेधडक #राजदंड pic.twitter.com/CPyn43HkRn
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 9, 2024
गोळीबाराने महाराष्ट्र हादरला –
मुंबईतील दहिसरमध्ये काल ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. तसेच गोळीबार करणाऱ्या मॉरीस नोरोन्हानेही याने देखील स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. तत्पूर्वी, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळी झाडल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती. दरम्यान, राज्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत.
हेही वाचा : मोठी बातमी! ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू