• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News: पाचोऱ्यात अवघ्या 4 तासांत मोटारसायकल चोरीचा उलगडा; आरोपीसह दुचाकी जप्त

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 16, 2026
in पाचोरा, क्राईम, ताज्या बातम्या
Pachora News: पाचोऱ्यात अवघ्या 4 तासांत मोटारसायकल चोरीचा उलगडा; आरोपीसह दुचाकी जप्त

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 16 मार्च: पाचोरा शहरात घडलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटनेचा पाचोरा पोलिसांनी अवघ्या चार तासांत छडा लावत आरोपीला ताब्यात घेत चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत केली. विशेष म्हणजे या प्रकरणाचे दोषारोपपत्रही अवघ्या 12 तासांच्या आत पाचोरा न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत शंकर वाघ (वय 42, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) यांनी १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८.३७ वाजता जामनेर रोडवरील राधाकृष्ण पेट्रोलपंप येथे त्यांची हिरो कंपनीची फॅशन प्रो (क्र. MH-19 BR-4211) ही लाल रंगाची मोटारसायकल उभी केली होती. काही वेळातच अज्ञात इसमाने सदर मोटारसायकल चोरी केल्याचे उघड झाले. याप्रकरणी तुषार लक्ष्मण आघाडे (वय २७, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११९/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३(२) अन्वये १४ मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी व पोलीस कॉन्स्टेबल शरद मांगो पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भारत डेअरी बसस्टॉप परिसरात एक इसम मोटारसायकलसह संशयास्पदरीत्या फिरताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चौकशी केली असता चोरीस गेलेली मोटारसायकल आढळून आली.

पोलिसांनी 12 तासांच्या आत दाखल केलं गुन्ह्याचे दोषारोपपत्र –

पोलिसी चौकशीत संशयिताने आपले नाव तुषार लक्ष्मण आघाडे (रा. सातगाव डोंगरी) असे सांगत गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पंचासमक्ष आरोपीकडून सुमारे १५ हजार रुपये किमतीची हिरो फॅशन प्रो मोटारसायकल जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी यांनी पूर्ण करून अवघ्या 12 तासांच्या आत गुन्ह्याचे दोषारोपपत्र पाचोरा न्यायालयात दाखल केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी आणि पोलीस कॉन्स्टेबल शरद मांगो पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली.

हेही वाचा: आधी प्रेमसंबंध अन् त्यातून ब्लॅकमेलिंग; पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं, पाचोरा तालुक्यातील नेमकी घटना काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: motorcycle theftpachora newspachora police stationsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर, ‘असा’ आहे निवडणुकीचा कार्यक्रम

राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर, ‘असा’ आहे निवडणुकीचा कार्यक्रम

March 16, 2026
मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 16, 2026
Pachora News: पाचोऱ्यात अवघ्या 4 तासांत मोटारसायकल चोरीचा उलगडा; आरोपीसह दुचाकी जप्त

Pachora News: पाचोऱ्यात अवघ्या 4 तासांत मोटारसायकल चोरीचा उलगडा; आरोपीसह दुचाकी जप्त

March 16, 2026
निधनवार्ता: लासगाव येथील तुळसाबाई विजयसिंग पाटील यांचं निधन

निधनवार्ता: लासगाव येथील तुळसाबाई विजयसिंग पाटील यांचं निधन

March 15, 2026
नवी दिल्लीत “अमृत मित्र महोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन; पाचोरा शहराच्या 80 महिला बचत गट प्रतिनिधींनी घेतला सहभाग

नवी दिल्लीत “अमृत मित्र महोत्सव” कार्यक्रमाचे आयोजन; पाचोरा शहराच्या 80 महिला बचत गट प्रतिनिधींनी घेतला सहभाग

March 15, 2026
‘रोपट्याला पाणी’ घालून कर्वे समाज सेवा संस्थेत राष्ट्रीय परिषदेचे अभिनव उद्घाटन; शिक्षण आणि ‘सीएसआर’च्या माध्यमातून शाश्वत विकासाचा वेध

‘रोपट्याला पाणी’ घालून कर्वे समाज सेवा संस्थेत राष्ट्रीय परिषदेचे अभिनव उद्घाटन; शिक्षण आणि ‘सीएसआर’च्या माध्यमातून शाश्वत विकासाचा वेध

March 15, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page