जळगाव, 10 एप्रिल : एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने महाराष्ट्र सध्या प्रचंड तापलाय. दरम्यान, आज नंदुरबारमध्ये 45.3 अंश तर जळगावात 43.7 आणि धुळ्यात 42 अंश इतके तापमान नोंदविण्यात आले आहे. दरम्यान, खान्देशात उन्हाचा पारा वाढल्याने नागरिकांना आता पुढील काही दिवस वाढत्या तापमानाचा सामना करावा लागणार आहे.
खान्देशात उन्हाचा वाढला पारा –
महाराष्ट्रात सध्या उष्णतेचा दाह वाढला असल्याने ठिकठिकाणी 40 अंशाहून अधिक तापमान नोंदविले जात आहे. हवामान विभागाच्या तापमान अंदाजानुसार, आज नंदूरबारमध्ये तापमानाचा पारा तब्बल 45.3 अंशांवर स्थिरावला आहे. तर जळगावात 43.7 अंशांची नोंद झालीय. यासोबत धुळ्याचे तापमान हे 45.3 अंशावर पोहचलंय. यामुळे वाढत्या तापमानामुळे सध्या नागरिक हैराण झाले आहेत.
राज्यात कडाक्याचे ऊन –
किमान तापमानही प्रचंड वाढल्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात सर्वत्र सकाळी साधारण 9 वाजल्यापासूनच उन्हाचा चटका बसू लागलाय. यामुळे उन्हाचा पारा वाढला असल्याचे चित्र सध्या निर्माण झालंय. राज्यात आतापर्यंत अनेक ठिकाणी 40 अंशाहून अधिक तापमानाचा नोंद झालीय.
हेही वाचा : “आम्ही पण घरात पवारसाहेबांना दैवत मानत होतो; आजही मानतो!”; अजित पवारांच्या विधानाने चर्चांना उधाण