धरणगाव (जळगाव) – आता जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. गावात प्रचंड उत्साह आहे. 10 वर्षापासून विरोधात आहे. मी अनेक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोललो की, मी विरोधात असतानाही तुम्हा सर्वांना सॅल्यूट आहे. एकच फक्त चाललेले आहे, समोर प्रचंड पैसा आहे. याला विकत घेऊ, त्याला विकत घेऊ. आज त्यांना प्रचार करण्यासाठी भाड्याने लोक आणावे लागत आहेत, या शब्दात गुलाबराव देवकर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टिका केली.
विधानसभा निवडणुची रणधुमाळी सर्वत्र पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जळगाव ग्रामीणचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारानिमित्त पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थित धरणगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुलाबराव देवकर यांनी पालकमंत्री आणि शिंदे गटाचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्यावर मतदारसंघातील विकासकामांच्या मुद्द्यांवरुन चौफेर टिका केली.
काय म्हणाले गुलाबराव देवकर –
2009 मध्ये साहेबांनी मला पहिल्यांना उमेदवारी दिली. हा मतदारसंघ तेव्हा नवीन निर्माण झाला होता. त्यावेळी फक्त एकच सभा दुपारी 2 वाजता याच जागेवर साहेबांची झाली होती आणि साहेबांची सभा झाल्यावर जे 2 पंचवार्षिक या मतदारसंघाचे आमदार होते, शिवसेनेचे उपनेते होते, त्यांचा पराभव आपण केला होता. आता पुन्हा साहेब आले आहेत. तुतारी वाजणार आहे.
2009 ला निवडून आल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल, साहेबांनी मला शपथविधीच्या 15 दिवस आधी बोलावले होते. त्यावेळी साहेबांचे पहिले वाक्य होते, गुलाबराव तुम्ही निवडून आले. कमाल केली आणि मला बाजूला बसवून सांगितले की, ज्यादिवशी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल, त्यादिवशी मी तुम्हाला मंत्रिमंडळात घेणार आहे, जिल्ह्याचे अधिकार देणार आहे. आता तुम्ही बाब घरातही सांगायची नाही. शपथविधीलाच तुम्हाला निरोप येईल.
सांगायचा अर्थ असा की, 15-20 दिवस आधी दिलेला शब्द, त्यावेळी साहेबांनी मला मंत्रिमंडळात घेतले. अडीच तीन वर्षे त्याठिकाणी होतो. कालावधी कमी मिळाला. परंतु काय कामे केली, ही तुम्हाला माहिती आहेत. अडीच वर्षाच्या कालावधी या मतदारसंघात हा धरणगावचा उड्डाणपूल आपण पहिल्याच प्रयत्नात बांधला.
दहीदुला गाढोदा हा गिरणीनदीवरचा पूल ज्यामुळे 50 किमी अंतर धरणगावला यायला कमी झाले. ते काण आपण केले. क्रीडा संकुलाच्या बांधकामाला सुरुवात केली. गावातल्या तेलीतलावाचे काम सुशोभीकरण केले. बालकवी ठोंबरे यांचा जन्म या गावातील. त्यावेळी समितीने येऊन मला विचारले, मागणी केली. याठिकाणी बालकवींचे स्मारक झाले तर चांगले होईल, असे म्हटले. त्यामुळे त्या कामालाही आपण याठिकाणी सुरुवात केली.
बहिणीबाई चौधरी या आपल्या खान्देशचे वैभव, खान्देशची अस्मिता आहेत, त्यांचे स्मारक झाले पाहिजे, ही कल्पना आमच्या डोक्यात आली, त्याही कामाला आपण सुरुवात केली. या मतदारसंघातील विहिरींना पाणी वाढले पाहिजे, सिंचनाचे क्षेत्र वाढले पाहिजे त्यासाठी 210 साठवण बंधारे बांधण्याचे काम केले. या धरणगाव शहरातील बस स्टँडचे बांधकाम केले. आणि जे पालकमंत्री 10 वर्षांपासून आहेत, त्यांच्या गावचं टपरीसारखं असलेले स्टँडचे बांधकाम आपण केले. त्यांच्या गावातला मुख्य रस्ता 10 वर्षे आमदार असताना त्याचे काम झालेले नव्हते. पावसाळा आल्यावर डबके साचायचे. त्या रस्त्याचे काम आपण केले. डिव्हायडर टाकले. स्ट्रीटलाईट लावले.
मी मागे एका सभेत बोललो होतो, गुलाबराव पाटलांनी आपल्या कालावधीत एखादे ठोस काम केले असेल, तर ते सांगावे, मी 1 लाख रुपयांचे बक्षीस देईल. अजून उत्तर आलेले नाही. येणार पण नाही. आता जाहीरातीचे बोर्ड लावले आहेत. त्यावर लिहिले आहे, विकास हाच आमचा धर्म. पण विकास कुठे आहे. पण त्यांनी 2 नंबर वाल्यांचा विकास केला, स्वत:च्या 2 नंबरच्या धंद्यांचा विकास केला.
रस्त्यांची कोट्यवधी रुपयांची कामे केली, मात्र, ती खराब झाली आहेत. हा पैसा गेला कुठे. म्हणे मी पाणीवाला बाबा आहे. पाणीपुरवठा खाते त्यांच्याकडे आहे. पण गंमत अशी आहे, गद्दारी करण्याआधीही त्यांच्याकडे पाणीपुरवठा खाते होते, गद्दारी केल्यावरही मंत्रिमडळाचा शपथविधी झाला आणि त्यावेळी त्यांनी आवर्जून मुख्यमंत्र्यांना पाणीपुरवठा खात्यासाठी सांगितले. मात्र, काय परिस्थिती आहे. साहेब या मतदारसंघात मोठ्या गावांना धरणगाव शहरात 25 दिवस पाणी येत नव्हते.
जर मी मंत्री असतो आणि माझ्याकडे हे खाते असते तर दाव्याने सांगतो, या धरणगाव शहराला दररोज पाणी दिले असते. त्यासाठी व्हिजन पाहिजे. काम करण्याची धमक पाहिजे. तळमळ पाहिजे. पाठपुरावा करायला हवा. पण यांचा दिवस कुठे जातो, तुम्हाला माहिती आहे
साहेब आता जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. गावात प्रचंड उत्साह आहे. 10 वर्षापासून विरोधात आहे. मी अनेक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोललो की, मी विरोधात असतानाही तुम्हा सर्वांना सॅल्यूट आहे. एकच फक्त चाललेले आहे, समोर प्रचंड पैसा आहे. याला विकत घेऊ, त्याला विकत घेऊ. आज त्यांना प्रचार करण्यासाठी भाड्याने लोक आणावे लागत आहेत.
पालकमंत्री असल्यावरही तुमच्या मतदारसंघातील शेतकऱ्याला पीकविमा मिळत नसेल, तर तुम्हाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. 2009 मध्ये मी कृषीमंत्री होतो. त्यावेळी आपल्या जिल्ह्यात केळीचे वारंवार नुकसान होत होते. मात्र, आम्ही त्यावेळी निर्णय घेतला की, केळीला विमा मिळाला पाहिजे. केळीचा समावेश पीकविम्यात झाला पाहिजे आणि तो समावेश आपण करुन घेतला. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. मात्र, आता 17-18 महिन्यांपासुनही अद्याप काही गटांमध्ये नुकसान भरपाई मिळाली नाहीये, असाही दावा गुलाबराव देवकर यांनी यावेळी केला.