• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home मनोरंजन

‘रात के ढाई बजे’ गाण्यातील प्रियांका चोप्राच्या लूकशी साधर्म्य असलेला नेहा हरसोराचा मराठमोळ्या नववधूचा लूक! 

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
April 19, 2024
in मनोरंजन
‘रात के ढाई बजे’ गाण्यातील प्रियांका चोप्राच्या लूकशी साधर्म्य असलेला नेहा हरसोराचा मराठमोळ्या नववधूचा लूक! 

मुंबई : प्रियांका चोप्राच्या लूकशी साधर्म्य असलेल्या आपल्या, लग्नसोहळ्यातील लूकबद्दल सांगत आहे ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘उडने की आशा’ या मालिकेत सायलीची भूमिका करणारी नेहा हरसोरा. प्रेक्षकांसमोर दर्जेदार मालिका सादर करण्याची परंपरा सुरू ठेवत, ‘स्टार प्लस’ वाहिनीने आजवर स्पर्श न केलेल्या आणखी एका विषयाला हात घातला आहे आणि ‘उडने की आशा’ ही नवी मालिका पेश केली आहे.

या मालिकेत कंवर ढिल्लन (सचिन) आणि नेहा हरसोरा (सायली) यांनी प्रमुख भूमिका वठवल्या असून सचिन आणि सायली यांच्या प्रेमाची गाथा आणि नातेसंबंधांची गुंतागुंत या मालिकेतून सादर केली जात आहे. या मालिकेला मराठमोळी पार्श्वभूमी लाभली आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सादर होणाऱ्या ‘उडने की आशा’ या मालिकेत एका पत्नीच्या भावभावनांच्या कल्लोळाचे चित्रण करण्यात आले आहे.

ती तिच्या बेफिकीर पतीचे रूपांतर जबाबदार व्यक्तीत कसे करते आणि याचा काही प्रमाणात संपूर्ण कुटुंबावर कसा परिणाम होतो, यावर बेतलेले हे नाट्य प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर खिळवून ठेवत आहे. कंवर ढिल्लन यांनी सचिनची भूमिका साकारली आहे, जो एक टॅक्सी ड्रायव्हर आहे, तर नेहा हरसोराने ‘उडने की आशा’ या मालिकेत सायली या फुलविक्रेतीची भूमिका साकारली आहे.

‘उडने की आशा’ या शोसाठी निर्मात्यांनी अलीकडेच एक वेधक प्रोमो प्रदर्शित केला आहे, ज्यात प्रेक्षकांना सचिन आणि सायली यांच्या लग्नाची झलक दाखवण्यात आली आहे, जे गुंतागुंतीच्या परिस्थितीत घडते. सचिन आणि सायलीचे लग्न हे एक साधेसुधे मराठमोळे पद्धतीने होणार आहे, ज्यात मोठी नाट्यमयता आणि अनेक वळणे आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा प्रसिद्ध बॉलीवूड गाणे ‘रात के ढाई बजे’मध्ये दिसते, तशी नऊवारी साडी सायलीने परिधान केलेली दिसेल आणि यात कुणालाही तिळमात्र शंका नाही, की सायली आणि प्रियांका चोप्रा यांचा लूक अगदी सारखा आहे.

सायलीला वधूच्या रूपात पाहणे प्रेक्षकांसाठी खरोखरच एक दृश्यात्मक मेजवानी ठरेल. तिला बघताना आपल्या सर्वांना अभिनेत्री प्रियांका चोप्राची नक्की आठवण होईल. प्रियांकाने या गाण्यातील तिच्या उपस्थितीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, सायली छोट्या पडद्यावरही पुन्हा तीच मोहिनी निर्माण करेल.

या संदर्भात बोलताना ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘उडने की आशा’ या मालिकेतील सायलीने ऊर्फ नेहा हरसोराने सांगितले, “उडने की आशा’ या मालिकेतील आगामी लग्नसोहळ्यात, प्रेक्षकांना अद्भुत नाट्य बघायला मिळेल. मालिकेतील नाट्य अनेक वळणे घेत असून सचिन आणि सायलीच्या आयुष्याचे दार ठोठावणार आहे. या मालिकेत मी सायली या मराठमोळ्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. मला मराठमोळ्या वधूची व्यक्तिरेखा साकारताना खूप छान वाटले. सायलीच्या लग्नसोहळ्यातील वधूच्या वेषातून अभिनेत्री प्रियांका चोप्राने साकारलेल्या ‘रात के ढाई बजे’ गाण्यातल्या लग्नाच्या वेषाची झलक दिसते आणि आपण त्या आठवणीत रमायला लागतो. ‘रात के ढाई बजे’ या गाण्यातील प्रियांका चोप्रा आणि ‘उडने की आशा’ या मालिकेतील सायली या दोघींनीही नऊवारी साडी परिधान केली आहे. मला लग्नसोहळ्यातील मराठमोळे विधी करताना आनंद वाटला आणि मला लग्नसोहळ्यात केल्या जाणाऱ्या विधींची माहितीही झाली. सचिन आणि सायलीच्या आयुष्यात उलगडत जाणारे नाट्य आणि ते दोघे अनपेक्षित परिस्थितीला कसे सामोरे जातात हे जरूर पाहा,” असेही ती म्हणाली.

राहुल कुमार तिवारी निर्मित, ‘उडने की आशा’ ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सोमवार ते रविवार रात्री 9 वाजता प्रसारित होत आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: entertainmentNeha HarsoraNeha Harsora latest newsudne ki aasha star plus

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

पाचोऱ्यात दुष्काळी पंचनामे अंतिम टप्प्यात; येत्या दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे नियोजन, तहसीलदार विजय बनसोडे यांची माहिती

October 10, 2026
जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

October 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page