संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 21 जून : पारोळा तहसील कार्यालय येथे महाविकास आघाडीतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी महाविकास आघाडीने महायुती सरकार निष्क्रिय असल्याचे म्हणत निषेध व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे नेते माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख दादासो डॉ हर्षल मनोहर माने(पाटील) यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी पारोळा तहसिलदार डॉ. उल्हास देवरे, एमएससीबीचे सहारे, कृषी विभागाचे दमाडे, पं समिती कृषी विभागाचे कोते यांना निवदेन दिले. दरम्यान, निवदेनात केलेल्या मागणींची अंमलबजावणी न झाल्यास पुढील आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
पारोळा कृऊबा समिती संचालक रोहन मोरे, नासिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, इगतपुरी आमदार हिरामण खोसकर, जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष पिरण अनुष्ठाण, मा. जि. प. सदस्य रोहन दादा (पवार) पाटील, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ. शांताराम पाटील, राष्ट्रवादी सरचिटणीस विजय पाटील, मा.जि.प. सदस्य डॉ. प्रवीण पाटील, पारोळा कृ.ऊ.बा. समिती संचालक रविंद्र रामराव पाटील, करमाडचे जिभाऊ पाटील, सुरेश वंजारी, निंबा आबा पाटील, सुनील रामोशी सोबत पारोळा शिवसेना तालुका प्रमुख प्रा. आर. बी. पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष महाजन, पारोळा शहर प्रमुख अशोक मराठे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष जितेंद्र पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख पाटील, अल्पसंख्यांक तालुका प्रमुख कलीम शीख, पारोळा उपशहर प्रमुख सोमनाथ वाणी, पारोळा शिवसेना वाहतूक सेना तालुका प्रमुख, शिवसेना उपशहर प्रमुख लखन वाणी, युवासेना जिल्हासमन्व्यक आबा महाजन, युवासेना उपजिल्हाधिकारी पराग गुंजाळ, युवासेना तालुका प्रमुख रवी पाटील, राष्ट्रवादी दिलीप पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश रोकडे, युवासेना शहर प्रमुख सनी लोहार, टेहू सरपंच विकास नाना, भूषण टिपरे, भूषण वाणी, सावन शिंपी, अरुण चौधरी, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सुवर्णा पाटील, कार्याध्यक्ष अॅड. स्वाती शिंदे, दगुबाई पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित आहे.
हेही वाचा : बैलाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू, पाचोरा तालुक्यातील सामनेर गावातील धक्कादायक घटना