ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 13 ऑगस्ट : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील जि. प. उर्दू शाळेत माजी जिल्हा परिषद सदस्य मधूकर काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत गणवेश वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मधूकर काटे यांना लोकनेते लोकनायक पुरस्कार मिळाल्याबद्दल समिती व शिक्षकांमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला.
एसएमसी अध्यक्ष तालीब शेख व माजी सरपंच डॉ. शांतीलाल तेली यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मागील भरतीत शाळेला शिक्षक मिळाल्याबद्दल तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील मधूकर काटे यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
मधूकर काटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांचे व शिक्षणाचे महत्व सांगितले. तसेच शाळेत कमी असलेली शिक्षक संख्या ही लवकरात लवकर भरली जाईल, असे आश्वासन देत जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून नवीन शिक्षक नियुक्तीबद्दल संदर्भात संवाद साधला. यावेळी मुख्याध्यापक अश्फाक अन्सारी तसेच एसएमसी अध्यक्ष तालीब शेख यांनी समिती व शिक्षक स्टाफतर्फे आलेले सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमात सरपंच सौ. सुनंदा कैलास क्षीरसागर, भाजपा पाचोरा तालुका अध्यक्ष सौ. शोभा शांतीलाल तेली, माजी सरपंच डॉ. शांतीलाल तेली, हाफिज कुतबोद्दीन साहब, हाफिज शाहिद साहब, हाफिज जावेद साहब, मौलाना रमजान साहब, हाफिज रेहान साहब, हाफिज जैद साहब, एसएमसी अध्यक्ष तालीब शेख, सदस्य जुबेर पिंजारी, सदस्य रहीम बागवान, सदस्य खलील शेख, सदस्य मोहसीन खान, सदस्य अश्फाक बागवान, सदस्य जावेद शेख, सदस्य इमरान शाह, सदस्य तालीब काझी, सदस्य हाफीज खान, मुख्याध्यापक अशपाक अन्सार, उपशिक्षक,अब्दुल मालिक, अबूउबैदा, तौकीर सर, समरीन मॅडम, इरम मॅडम, नागरिक तसेच पालक, वसीम साथी, शकील खान, गुफरान शेख, आदी उपस्थित होते.