• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News: पाचोरा बसस्थानकावरील पाकिटमारी प्रकरणाचा उलगडा; तीन महिला आरोपींना पोलिसांनी केली अटक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 24, 2026
in पाचोरा, क्राईम, ताज्या बातम्या
Pachora News: पाचोरा बसस्थानकावरील पाकिटमारी प्रकरणाचा उलगडा; तीन महिला आरोपींना पोलिसांनी केली अटक

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 24 फेब्रुवारी: पाचोरा पोलीस ठाणे येथील गुन्हे शोध पथकाने बसस्थानक परिसरात घडलेल्या पाकिटमारी प्रकरणाचा यशस्वी उलगडा करत तीन महिला आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून एकूण ३२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी सव्वा तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास, श्रावण ताराचंद पाटील (वय ७०, रा. वडगाव खुर्द, ता. पाचोरा) हे पाचोरा बसस्थानक येथे बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून १३ हजार ४०० रुपये लंपास केले होते. या प्रकरणी ४ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, २३ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाचोरा बसस्थानक परिसरात तीन संशयित महिला पाकिटमारीसाठी टेहळणी करत आहेत. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संबंधित महिलांना ताब्यात घेतले.

चौकशीअंती आरोपींची नावे निर्मला सुनिल जोशी (वय ३३, रा. गंगापुरी, ता. जामनेर), सोनाली गणेश विधाते (वय २४, रा. हिसोडा खुर्द, ता. भोकरदन, सध्या रा. कुंभारी, ता. जामनेर) आणि उषाबाई तेजराव ऐकणार (वय ५५, रा. कुंभारी, ता. जामनेर) अशी असल्याचे निष्पन्न झाले.

तिघींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पंचासमक्ष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अंगझडती घेतली असता आरोपी क्रमांक १ कडून १३,५०० रुपये, आरोपी क्रमांक २ कडून ६,६०० रुपये आणि आरोपी क्रमांक ३ कडून १२,३०० रुपये असे एकूण ३२,४०० रुपये जप्त करण्यात आले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी करीत आहेत.

यांनी केली कारवाई –

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी, पोहेकॉ अशोक रामचंद्र हटकर, पोकॉ शरद मांगो पाटील, पोकॉ श्रीराम अनिल शिंपी, मपोकॉ प्रियंका अर्जुन आहेर, पोकॉ योगेश पाटील, पोकॉ संदिप राजपुत, मपोकॉ/महोमगार्ड सोनाली शशीकांत पाटील, महोमगार्ड कल्पना तानाजी निंबाळकर, महोमगार्ड संगीता मुरलीधर पाटील यांनी पार पाडली आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ आणि मोबाईल ॲपचे उद्घाटन, नेमकं काय आहे ‘हे’ अ‍ॅप?

बातमी शेअर करा !
Share
Tags: female accusedpachora latest newspachora police stationpickpocketing on bus standsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त राज्यात वर्षभर उपक्रम

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त राज्यात वर्षभर उपक्रम

April 11, 2026
महिला व बालविकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या 2 लाखांहून अधिक पदांना मंजुरी

महिला व बालविकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या 2 लाखांहून अधिक पदांना मंजुरी

April 11, 2026
चाळीसगावच्या पिलखोडचे जवान जावेद अहमद यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारांतर्गत ₹60 लाखांची मदत; पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश प्रदान

चाळीसगावच्या पिलखोडचे जवान जावेद अहमद यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारांतर्गत ₹60 लाखांची मदत; पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश प्रदान

April 10, 2026
खरीप हंगाम 2026 नियोजनासाठी जिल्हास्तरीय बैठक; शेतकऱ्यांना पुरेशा खत पुरवठ्याचा आढावा

खरीप हंगाम 2026 नियोजनासाठी जिल्हास्तरीय बैठक; शेतकऱ्यांना पुरेशा खत पुरवठ्याचा आढावा

April 10, 2026
जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार; पहिल्याच दिवशी विभागांना दिल्या भेटी

जळगाव जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वीकारला पदभार; पहिल्याच दिवशी विभागांना दिल्या भेटी

April 10, 2026
खरीप हंगाम 2026: जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

खरीप हंगाम 2026: जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page