जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला असून या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघात घडताच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ या काही वेळातच परधाडे येथे पोहचून परिस्थिती हाताळली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हेही घटनास्थळी थांबून होते. घटनास्थळाचा ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’च्या टीमने घेतलेला आढावा.