मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 10 ऑगस्ट : कवी भिमराज पावरा लिखित “पावरा भातीभातीन गीदे” काव्य संग्रहाचे प्रकाशन काल 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून चोपडा तालुक्यातील सनपुले येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत उपशिक्षक भीमराज होजाऱ्या पावरा लिखित “पावरा भातीभातीन गीदे” पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पावरा बोली भाषेतील कवितांचा हा काव्यसंग्रह तसेच त्या कवितांचा मराठी भाषेतील अनुवाद असे एकत्रित काव्यसंग्रहाच्या निमित्ताने आदिवासी गोरगरीब जनतेपर्यंत हे साहित्य पोहचेल व त्यांचा भाषिक विकास व्हायला मदत होईल, अशी भावना यावेळी संस्थेचे सचिव गणेश पाटील व्यक्त केली. दरम्यान, वीर बिरसा मुंडा यांची प्रतिमा व प्रशस्तीपत्र देत शाळेने त्यांच्या नवोदित कवी म्हणून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला विर बिरसा मुंडा तसेच खाज्या नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष पी.जे.पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक मुख्याध्यापक सी.डी. पाटील व माध्यमिक मुख्याध्यापक एन.एम.पाटील तसेच अशोक महाजन व गजानन पाटील हे होते. कार्यक्रमाचे संचालन गजानन पाटील यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर पाटील यांनी मानले.
हेही वाचा : बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाची जळगाव जिल्हा बंदची हाक