ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 2 सप्टेंबर : पाचोरा तालुक्यातील वडगाव (कडे) येथे सालाबादप्रमाणे पोळासण अतीशय आनंदात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम गावाच्या वेशीवर आंब्याचे तोरण बांधून सर्व गावातील सजवलेले बैल वेशीवर गोळा झाल्यावर पोलिस पाटील यांच्या हस्ते 1 बैलाची पूजा करुन पोळा फोडतात, अशा त्याठिकाणची प्रथा आहे. त्याप्रमाणेच यंदाचा पोळा सण साजरा करण्यात आला.
बैल पोळानिमित्ताने जि.प सदस्य मधू काटे ,पोलीस पाटील सुनील काटे, तंट मुक्ती अध्यक्ष गजानन भाऊ, माजी सरपंच अतुल पाटील, भाजपा आध्यात्मिक आघाडी तालुका अध्यक्ष संदीप पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा शेतात राबणारा बैल मित्र त्याला सजवून आज पुरणपोळीचा नैवेद्य खायला घालत असतात व त्या वृषभाची पूजा करत असतात हाच वृषभ महादेवाचं वाहन म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणून महादेवाच्या मंदिरात सर्वप्रथम नंदीचे दर्शन करायचं असतं, अशा या बैला विषयीचा कृतज्ञ भाव म्हणून पोळा साजरा केला जातो.
हेही वाचा : Pola 2024 : वडगाव कडे येथे पोळा सण उत्साहात साजरा