जळगाव, 6 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या विकासाची झलक प्रगतिशील महाराष्ट्र 2025 या प्रदर्शनात पाहायला मिळाली. जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून केंद्र सरकारची सर्व खाती एका छताखाली आणली असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्याचे वस्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे यांनी काढले.
खा. स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील फ्रेडज एक्झिबिशन एंड प्रमोशनच्या वतीने येथील शिवतीर्थ येथे सुरु असलेल्या प्रगतिशील महाराष्ट्र 2025 या प्रदर्शनाच्या समारोप सोहळयात ते बुधवारी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर आमदार राजूमामा भोळे, भाजपा संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, महाराष्ट्र भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवीताई वाघ, गोदावरी शिक्षण संकुलाच्या अध्यक्षा केतकीताई पाटील, माजी जि. प. सदस्य राकेश पाटील, माजी नगरसेवक विशाल त्रिपाठी, अजित राणे, एल डी एम श्री. सुनील डोहरे, फ्रेंड्ज एक्झिबिशनच्या प्रोजेक्ट हेड अखिला श्रीनिवासन, विभागीय प्रमुख दत्ता थोरे, प्रोजेक्ट सहाय्यक दिपक सिंग मेहता, आरबीआईचे सुनील डोहारे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आ. राजूमामा भोळे म्हणाले की, गेल्या तीन दिवसात मी या प्रदर्शनाला पाहतो आहे. तिनही दिवस जळगाव या प्रदर्शनाच्या माध्यमातून माहिती मिळवीत आहे. इथे आलेल्या अधिकाऱ्यांनी लोकांना खुप चांगल्या पद्धतिने माहिती दिली. अधिकारी आणि लोकप्रतिनिधिनी मिळून काम कसे करायचे याचा हा आदर्श वस्तुपाठच होता, असे सांगितले.
तिसऱ्या दिवशीही प्रदर्शनाला अलोट गर्दी उसळली. बुधवारी सूटी असतानाही जळगाव शहर आणि जिल्ह्यातील शाळा आणि कोलेजच्या विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागातील सरपंच, उपसरपंच आणि नागरिकानी आवर्जून भेट दिली. तीन दिवसात असंख्य लोकांच्या भेटिने प्रदर्शनाची दिमाखदार सांगता झाली.
पारोतोषिक देऊन गौरव –
सशस्त्र दलांना सक्षम करण्यासाठी सर्वोत्तम स्टॉल – मुनिशन्स इंडिया लिमिटेड, सर्वोत्तम इंटरॅक्टिव्ह स्टॉल – भारताचे भूगर्भीय सर्वेक्षण, डिजिटल इनोव्हेशन आणि स्मार्ट, सोल्यूशनमधील सर्वोत्तम स्टॉल – गुजरात इन्फॉर्मेटिक्स लिमिटेड, वाहतूक आणि पायाभूत सुविधांमध्ये सर्वोत्तम स्टॉल – भारतीय रेल्वे, बँकिंग क्षेत्रातील सर्वोत्तम स्टॉल – स्टेट बँक ऑफ इंडिया, सर्वोत्तम माहितीपूर्ण स्टॉल – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सायबर सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्तम स्टॉल – व्हाईट बँड असोसिएट्स, पर्यावरणास अनुकूल आणि शाश्वत उपायांना प्रोत्साहन सर्वोत्तम स्टॉल – फलोत्पादन आणि वृक्षारोपण कॉर्पोरेशन विभाग – तमिळनाडू, ऊर्जा क्षेत्रातील इनोव्हेशनमध्ये सर्वोत्तम स्टॉल – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (महागेनको), वैद्यकीय संशोधनात सर्वोत्तम स्टॉल – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, सेंद्रिय आणि नैसर्गिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्तम स्टॉल – ईशान्य कृषी विपणन महामंडळ लिमिटेड (नेरामॅक), बांबूच्या प्रचारासाठी सर्वोत्तम स्टॉल – ओडिशा बांबू विकास एजन्सी, बायोटेक्नॉलॉजी इनोव्हेशनमधील सर्वोत्तम स्टॉल – जैवतंत्रज्ञान विभाग, पोल्ट्री विकास आणि इनोव्हेशनमधील सर्वोत्तम स्टॉल – केंद्रीय कुक्कुटपालन विकास संघटना, सार्वजनिक आरोग्य, इनोव्हेशन आणि अॅडव्हान्सिंग होमिओपॅथी संशोधनातील सर्वोत्तम स्टॉल – केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद (CCRH).
विद्यार्थ्यांच्या शोध प्रकल्प स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी प्रथम –
या प्रदर्शनात स्थानिक मुलांना संधी म्हणून शाळा आणि कोलेजच्या मुलांची शोधप्रकल्प स्पर्धा घेण्यात आली. यात ऑल इन वन रोबोटिक किट प्रकल्पासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रथम, केसीई अभियांत्रिकी कोलेजच्या मुलांना मशीन पोवर्ड बाय सोलर एनर्जीच्या शोध प्रकल्पासाठी द्वितीय क्रमांक तर पोदार इंटनेशनल स्कुलच्या मुलांना थ्रेट ऑफ हुम्यानीटी या प्रकल्पासाठी तृतीय क्रमांक देऊन गौरविन्यात आले. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी दत्ता थोरे यांनी प्रास्ताविक केले. सरिता खोचने यांनी सूत्रसंचालन केले तर दीपकसिंग मेहता यांनी आभार प्रदर्शन केले.






