• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 25, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुंबई, 24 फेब्रुवारी: देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे.  जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासन सातत्याने कार्यरत असून या क्षेत्रातील नवोपक्रमांना संशोधनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून  प्रोत्साहन दिले जात आहे. प्रत्येक भारतीयाला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहचविणे हेच देशसेवेचे महत्त्वपूर्ण अंग असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधोरेखित केले.

लोक भवन येथील दरबार सभागृहात  पी. डी हिंदुजा रुग्णालयाच्या ‘जीवन वाचवणे आणि निरोगी भारत निर्माण करणे’ या देशव्यापी मोहिमेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मोहिमेचे उद्घाटन राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, देशात औषधनिर्मिती आणि आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. सर्व देशवासी निरोगी राहावेत, यासाठी आयुष्यमान भारत अंतर्गत एक लाखांहून अधिक आरोग्य मंदिर कार्यरत आहेत. तसेच मिशन इंद्रधनुष्य सारख्या उपक्रमांद्वारे लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे. देशात 12 कोटींहून अधिक कुटुंबांना आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात आले असून यामुळे लाखो नागरिकांना उपचारांचा आधार मिळाला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही तातडीच्या वैद्यकीय सेवांना प्राधान्य देत रुग्णवाहिका सेवा व ट्रॉमा केअर सेंटरच्या सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. यासोबतच जनसामान्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे. योग्य वेळी उपचारांची माहिती व सुविधा उपलब्ध झाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात,असेही त्यांनी नमूद केले. देशात अनेक महत्त्वपूर्ण औषधांचे उत्पादन होत असले तरी काही वैद्यकीय उपकरणे व औषधे आयात करावी लागतात. ती देशातच तयार व्हावीत यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही राष्ट्रपती मुर्मू यांनी केले.

कोविडनंतरच्या काळात मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. एकाकीपणा, उदासीनता यांसारख्या समस्यांमुळे वैयक्तिक, कौटुंबिक व व्यावसायिक आयुष्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे मानसिक आरोग्य सेवाही तितक्याच सक्षमपणे उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा राष्ट्रपती मुर्मू  यांनी यावेळी व्यक्त केली.

वैद्यकीय शिक्षणासाठी पदव्युत्तर पदवीच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक राज्यांमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान रुग्णालये सुरू करण्यात आली असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.  हिंदुजा हॉस्पिटल समूह  यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या “जीव वाचविणे, निरोगी भारत निर्माण करणे” (Saving Lives, Building a Healthier Bharat Mission) या अभियानाचे त्यांनी कौतुक केले. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमांतर्गत दुर्गम व ग्रामीण भागात रुग्णसेवा पुरविण्यात येणार असून तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून जीव वाचविण्याचे पुण्यकर्म या अभियानाच्या माध्यमातून होत असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी काढले.

नैसर्गिक जीवनपद्धतीचा अवलंब केल्यास वैद्यकीय क्षेत्रावरील ताण कमी – राज्यपाल आचार्य देवव्रत

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले असून, नैसर्गिक जीवनपद्धतीचा अवलंब केल्यास वैद्यकीय क्षेत्रावरील ताण कमी होऊ शकतो. मानव, निसर्ग आणि धरती वाचवण्यासाठी  आजारांचे वाढते प्रमाण रोखण्याच्या दृष्टीने वैद्यकीय तज्ञांनी  कार्य करण्याची गरज असल्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सांगितले.

कोविड-१९ काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने लसीचा शोध लावून ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ या तत्वानुसार जगातील अनेक देशांना लस उपलब्ध करून दिली. गरीब व वंचित घटकांसाठी कार्य करणे हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा पैलू असून, त्याच भावनेतून आरोग्य क्षेत्रात सेवा कार्य अधिक व्यापक व्हावे, असे  आवाहन राज्यपाल देवव्रत यांनी केले.

हिंदुजा रुग्णालय समूहाच्या वतीने  गेल्या 75 वर्षांत मानवतावादी दृष्टिकोनातून उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. देश-विदेशातील रुग्णांना दर्जेदार उपचार देऊन या संस्थेने भारताची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली आहे, असे त्यांनी सांगितले.ग्रामीण व दुर्गम भागातील वंचित आणि गरजू रुग्णांना सेवा देण्याचे कार्य विशेष महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कॅन्सर, हृदयविकार, किडनीशी संबंधित आजारांच्या मुळावर उपचार होणे अत्यावश्यक असून, दिनचर्या, आहार पद्धती यांचा आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी सखोल विचार करणे गरजेचे असल्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत सांगितले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  हिंदुजा रुग्णालयाच्यावतीने त्यांच्या कार्यावर आधारित आयोजित चित्र प्रदर्शनीला भेट दिली आणि हिंदुजा समूहाच्या विविध कार्याची माहिती घेतली.

कार्यक्रमाला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल,  खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार मिलिंद देवरा यांच्यासह हिंदुजा समूहाच्या  रुग्णालयांमधील डॉक्टर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा: VIDEO |उत्तर महाराष्ट्राच्या जलद कनेक्टिव्हिटीसाठी 105 किलोमीटर लांबीचा खान्देश एक्सप्रेसवेचा डीपीआर प्रक्रियेत – राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newspresident draupadi murmuquality healthcaresuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

April 14, 2026
जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; 1 लाख रूपयांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्याला पकडले रंगेहाथ

जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; 1 लाख रूपयांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्याला पकडले रंगेहाथ

April 14, 2026
सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलिन; शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलिन; शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

April 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page