जळगाव, 14 ऑक्टोबर : गेल्या आठवड्याभरापासून जळगाव जिल्ह्यातील विविध भागात परतीच्या पावसाने हजेरी लावलीय. असे असताना आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवार रोजी जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, आज राज्यात पुन्हा एकदा पावसाचा अलर्च देण्यात आला आहे.
राज्यात आज पुन्हा पावसाचा अलर्ट –
राज्यात परतीचा पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना हा पाऊस अद्याप माघारी फिरलेला नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यात शनिवार तसेच रविवारी जोरदार पाऊस झाला. दरम्यान, राज्यात आज देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच आज पालघर, ठाणे, धुळे, नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट व हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कृपया, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा
https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos
जळगावचा हवामान अंदाज काय? –
खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावलीय. गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय. आतापर्यंत खान्देशातील तीनही जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झालीय. दरम्यान, पाचोरा तालुक्यात काल रविवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पाचोरा तालुक्यात शेतपीकांचे नुकसान –
जळगाव जिल्ह्यातील विविध भागात आज संध्याकाळी किंवा रात्री ढगांच्या गडगडाटसह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, शेतपीक ऐन काढणीला आली असताना तसेच कापूस घरी आणण्याची वेळ आली असताना परतीच्या पावासामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.