अयोध्या, 22 जानेवारी : संपूर्ण भारतासाठी नव्हे तर जगभरातील राम भक्तांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. अयोध्येतील राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात आज पार पडतोय. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मंदिरात प्राण प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. आजच्या ऐतिहासिक सोहळ्याची लाईव्ह अपडेट सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजवर जाणून घेऊयात.
12:31 PM – 22 Jan 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुजाविधी पार पडली. प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विधीवत पद्धतीने विराजमान झाले आहेत. दरम्यान, राम भक्तांची शेकडो वर्षांपासूनची असलेली प्रतिक्षा संपली आहे.
12:20 PM- 22 Jan 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या पुजेस सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गर्भागृहात पुजा सुरू असून त्यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित आहेत.
12:08 PM- 22 Jan 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरात प्रवेश केला आहे. थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.
11:15 AM – 22 Jan 2024
दिग्गजांची मांदियाळी –
अयोध्येतील या सोहळ्यासाठी देशभरातील व्हीआयपी तसेच व्हीव्हीआयपींना निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच अनेक दिग्गज अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज दाखल झाले आहे. अभिनेत अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अनुपम खेर, ज़ैकी श्रॉफ, आयुषमान खुराणा, अभिनेत्री कंगना रानौत, हेमा मालिनी गायक कैलाश खेर, तेलुगू सुपरस्टार राम चरण आणि चिरंजीवी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत,
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे उद्योगपती अनिल अंबानी, रामाची भूमिका साकारणारे अरूण गोविल हे उपस्थित आहेत. तसेच मुकेश अंबानी देखील त्यांच्या परिवारासह उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आगमन –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरार्ष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले असून लवकरच ते राम जन्मभूमी मंदिराकडे दाखल होणार आहेत.