जळगाव, 6 फेब्रुवारी : राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आणि प्रोटॉनचे जिल्हा प्रशिक्षण शिबीर संपन्न काल यशस्वीरित्या संपन्न झाले. काल रविवारी जळगाव शहरातील पत्रकार भवन येथे हे प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन विशाल सोनवणे आणि नायब तहसीलदार जळगाव यांनी केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन शशिकांत हिंगोणेकर (विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, लातुर) हे उपस्थित होते. तसेच अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक प्रा. डॉ. संघरक्षित भदरगे (राज्य प्रभारी, असंघटित क्षेत्र महाराष्ट्र राज्य) हे होते.
अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. संघरक्षित भदरगे यांनी संघटित व असंघटित कामगारांना संविधानात केलेल्या तरतुदींची मांडणी केली. राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ही बामसेफची सहयोगी संघटना आहे. ही ट्रेड युनियन आहे. ट्रेड युनियन अॅक्ट 1926 च्या कामगार कायद्यान्वये या ट्रेड युनियला भारत सरकारची मान्यता आहे. याअंतर्गत 849 विविध संघटना समाविष्ट आहेत. भारतात 16 हजार 153 ट्रेड युनियन आहेत. धर्मादाय कामगार नोंदणी ॲक्ट 19630 नुसार भारतातील बऱ्याचशा संघटना नोंदणीकृत आहेत. या दोन प्रकारच्या संघटना आहेत. त्यामुळे या संघटनांना आंदोलन, मोर्च काढण्याचे अधिकार नाहीत. त्यांना मेस्मा कायदा लागु आहे.
बहुसंख्य कर्मचारी हे बहुजन समाजातील असल्याने त्यांचे संवैधानिक हक्क व अधिकार सुरक्षित रहावेत यासाठी या काही ट्रेड युनियन कोणताही प्रयत्न करत नसल्याने राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ही बहुजनांची ट्रेड युनियन 2013 साली स्थापन करण्यात आली. राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ खासगीकरणाच्या विरोधात लढत आहे. नवीन पेन्शन योजना, शिक्षण क्षेत्राचे खासगीकरण व बाजारीकरण, सरकारी उद्योगांची भांडवलदारांना विक्री अशा विविध समस्यांवर विरोध करीत आहे, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर नरवाडे (जळगाव जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ) यांनी केले. तर प्रास्ताविक बामसेफचे राज्य कार्याध्यक्ष सुमित्र अहिरे यांनी प्रास्ताविक केले. तसेच शेवटी आभार राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जळगाव जिल्हा सदस्य राहुल अहिरे यांनी आभार मानले. या प्रशिक्षण शिबिराला जळगाव जिल्ह्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व प्रोटानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.